Tukaram Mundhe has issued a directive stating that hospitals cannot compel patients to buy medicines exclusively from their in-house pharmacies. Sarkarnama
महाराष्ट्र

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या आदेशाने बड्या रुग्णालयांचे धाबे दणाणले, सक्ती केली तर थेट कारवाई! आता औषधे...

Hospitals Pharmacy : रुग्णालयांना त्यांच्या फार्मसीमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती रुग्णांवर करता येणार नाही, या संदर्भात तुकाराम मुंढेंनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

Roshan More

Tukaram Mundhe News: रुग्णलायत रुग्ण दाखल असताना त्याच रुग्णालयाच्या फाॅर्मसीमधून औषधे आणि वैद्यकीय साहित्य खरेदीची सक्ती केली जाते. या सक्ती विरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना औषधी खरेदी कोठून करायची याची सक्ती करता येणार नाही, खरेदी कोठून करायची हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, असे आदेश मुंढे यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील मुंढे यांनी दिला आहे.

मुंढे म्हणाले, रुग्णालयात कोणी पेशंट अ‍ॅडमीट असेल त्याला औषधे लागत असतील तर त्यांच्या फार्मसीमधून घ्यायची, अशा काही तक्रारी असतात. कायद्यानुसार कुठलेही रुग्णालय या प्रकारे सक्ती करू शकत नाही. पेशंटचा जर बाहेर औषध आणायचे असेल तर तो त्यांचा चाॅईस आहे.

तुमच्याच फर्मासी (रुग्णालयाच्या) किंवा इतर कुठल्या फार्मसीमधून औषधे घ्या असा आग्रह करता येणार नाही. तुम्हाला त्यांना औषधांचे प्रिस्क्रिप्शन द्यावे लागेल. त्यानंतर पेशंटचे नातेवाईक ठरवतील त्यांना ती औषधे कुठून घ्यायची आहेत. नोंदणीकृत कुठल्याही फार्मसीमधून ते औषधे घेऊ शकतील, या संदर्भातील आदेश आम्ही आज पारीत केला आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

...तर मकोका लावणार

गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली करण्याचे, असे निर्देश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT