Tukaram Munde Sarkarnama
महाराष्ट्र

Tukaram Munde News: तुकाराम मुंढेसारखा अधिकारी 50 वर्षांत पहिल्यांदाच पाहिला, 21 वर्षांतल्या त्यांच्या 24 बदल्यांची चौकशी करा; बड्या नेत्याची मागणी

Maharashtra News: डॅशिंग आयएएस तुकाराम मुंढे यांची काही दिवसांपूर्वीच 21 वर्षांच्या सेवेतील 24 वी बदली करण्यात आली आहे.त्यांनी नुकतीच मंत्री नरहरी झिरवाळांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Deepak Kulkarni

Buldhana News : डॅशिंग आयएएस तुकाराम मुंढे यांची काही दिवसांपूर्वीच 21 वर्षांच्या सेवेतील 24 वी बदली करण्यात आली आहे.त्यांनी नुकतीच मंत्री नरहरी झिरवाळांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. यानंतर त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात धडक कारवाया करण्यात येत आहे.या कारवायांमुळे मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले असतानाच काँग्रेसच्या बड्या नेत्यानंही त्यांचं कौतुक करतानाच गंभीर मुद्द्याला हात घातला आहे.

माजी राज्यमंत्री व बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार सुबोध सावजी यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहित तुकाराम मुंढेंचं कौतुक करतानाच मोठी मागणी केली आहे. गेल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आपण असा कर्तव्यदक्ष अधिकारी पाहिला नसल्याचा दावा सावजी यांनी पत्रात केला आहे. तसेच त्यांनी यावेळी पत्राद्वारे मुंढेंच्या 21 वर्षांतील 24 बदल्यांची चौकशी करण्याची मागणीही या पत्रात केली आहे.

काँग्रेस नेते सुबोध सावजी यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय सेवेची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणीही केली आहे.

तसेच तुकाराम मुंढे यांच्या अंदाजे 21 वर्षांच्या सेवेमध्ये तब्बल 24 वेळा बदल्या झाल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या बदल्यांमागे कोणताही हलगर्जीपणा,कामातील अनियमितता, भ्रष्टाचार किंवा वरिष्ठांचा अवमान करणे अशी कारणे नसून या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रपतींनी चौकशी करावी असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

मी राज्यात तीनवेळा आमदार व एकदा मंंत्री राहिलो असून माझ्या राजकीय कारकिर्दीत तुकाराम मुंढेंसारखा कर्तव्यदक्ष अधिकारी पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. म्हणूनच स्वतःहून त्यांची शिफारस करत असल्याचं सुबोध सावजी म्हणतात.या शिफारसीमागे माझा कोणताही वैयक्तिक संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मी त्यांना कधी पाहिलेलं नसून त्यांना मला कधी पाहिलेलं नाही.मात्र, कर्तबगार अधिकाऱ्याचा असा मानसन्मान झाल्यास देशात एक चांगला संदेश जाईल,असंही सुबोध सावजी पत्रात म्हणतात. तसेच मुंढे यांनी जिथे जिथे काम केले,तिथे अत्यंत इमानदारीने आणि भ्रष्टाचारमुक्त सेवा दिल्याचाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.

सुबोध सावजी हे पत्रात पुढे म्हणतात,भविष्यात तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागातून बदली करण्यात आली तर त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या गृह विभागात मोठ्या पदावर करण्यात यावी असंही त्यांनी साकडं राष्ट्रपतींना पत्राद्वारे घातलं आहे.

मुंढेंचा कारवायांचा धडाका ...

आयएएस तुकाराम मुंढे यांनी नुकतीच अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर राज्यभरात तिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांविरोधातील कारवाईचा तडाखा लावण्यात आला आहे. राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवत आहे. 6 दिवासांत 203 छापे टाकण्यात आले असून यामध्ये 102 अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातील जवळपास 68 दुकानं आणि हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT