

Pune News: राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्तेत आलेल्या महायुती सरकारकडून सातत्यानं प्रशासनात मोठे बदल केले जात आहेत. सरकारने वरिष्ठ आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावल्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक अपडेट समोर आली होती. बदली झालेल्या एका सीआयडीच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी पोलिस सेवेतील गंभीर बाब समोर आणत आरोपांमुळे नवा बॉम्ब पडला होता.
राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वीच पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले होते.यात भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील 100 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश होता. याच बदल्यांमध्ये सीआयडी अधीक्षक वैशाली माने यांची पुण्यातून थेट मीरा-भाईंदरच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या बदलीनंतर त्यांनी पोलिस सेवेतील काही गंभीर मुद्दे उपस्थित करत खळबळ उडवून दिली होती. यानंतर आता त्यांच्या बदलीला सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) पोलीस अधीक्षक वैशाली माने यांची नुकतीच करण्यात आलेली बदली राज्य सरकारने रद्द केली आहे. गृह विभागाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला असून त्यांचं नवं पोस्टिंग वेटिंगवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वैशाली माने यांनी पोलिस सेवेतील महिला अधिकाऱ्यांना पोलीस दलात मिळणाऱ्या वागणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच बदल्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांना डावलले जात असून त्यांना न्याय नाकारला जात असल्याचा आरोपही माने यांनी केला होता. या आरोपांची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
पुणे येथे सीआयडीच्या अधिक्षकपदी कार्यरत असताना वैशाली माने यांच्याबदलीचे आदेश आले होते. त्यांची मीरा-भाईंदरच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी महिला अधिकाऱ्यांना अनेकदा दुय्यम पदांवर नेमले जाते किंवा इतक्या दुर्गम ठिकाणी पाठवले जाते की, थेट काम करणे कठीण होते,या आरोपांनी पोलिस प्रशासनही हादरलं होतं.
तसेच त्यांनी हा प्रश्न केवळ नियुक्तीचा नसल्याचं सांगत सन्मानाचा असल्याचंही म्हणणं मांडलं होतं. पोलिस प्रशासनाने एक महिला अधिकारी म्हणून काम करताना होणारा त्रास,अपेक्षा यांच्यासह विविध मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली होती.
वैशाली माने यांनी माध्यमांशी संवाद साधतानाच पोलीस दलातील निर्णयप्रक्रियेबाबतही शंका उपस्थित केली होती. त्यांनी पोलिस प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेत महिलांकडे पाहण्याबाबतच्या दृष्टिकोनावरही बोट ठेवलं होतं. महिला अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देताना समान निकष लावले जात नसल्याची खदखदही त्यांनी बोलून दाखवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.