Uday Samant Sarkarnama
महाराष्ट्र

Uday Samant : उदय सामंतांचे मोठे विधान; म्हणाले,'उपमुख्यमंत्री पदासाठीचा निर्णय...'

Uday Samant statement on Deputy Chief Minister role: रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पाचव्यांदा निवडून आल्यानंतर महायुतीमध्ये शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला समोर जावे लागले. महायुतीनं राज्यात तब्बल 230 जागांवर विजय मिळवत सर्वांचे अंदाज चुकवले.

मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये फक्त 50 चा आकडा गाठता आलेला नाही. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्या सामंत यांनी मोठं विधान केले आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पाचव्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. महायुतीमध्ये शिवसेनेकडून (Shivsena)उपमुख्यमंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

आपले नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे ? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, मला याबद्दल काहीही माहिती नाही. माझं नाव चर्चेत आहे किंवा नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे, ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल, जी जबाबदारी सोपवतील ती जबाबदारी पार पाडू, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी यावेळी दिली

यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आमच्यामध्ये कोणती वैयक्तिक मतभेद नाहीत, पण हे राजकीय तत्वाचे वैर असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केलं. गुहागरमध्ये आम्ही परत एकदा पुन्हा जोमाने काम करू असंही सामंत यांनी म्हटले आहे.

आमच्याकडे काय काय चाललंय हे पाहण्यापेक्षा तुमच्याकडे जे काही सोळा दहा वीस आमदार निवडून आहेत ते तुमच्याबरोबर कसे राहतील याच्यावर तुम्ही जास्त मेहनत करायला हवी, अशा शब्दात माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावलं आहे.

महायुतीकडून मनसेला येण्याचे आमंत्रण दिलं होतं, काही जागा सोडण्याची ही तयारी झाली होती. दादर माहीमची जागा ते मागत होते. त्यांचा यावरून काहीतरी गैरसमज झाला असेल तो लवकरात लवकर दूर होईल, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली. सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्यादा आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर अन्याय व्हावं असं कसं होऊ देतील, असेही ते म्हणाले.

विरोधकांना आंदोलनाशिवाय दुसरे काम उरले नाही

महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन उभारत आहेत याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, आता त्यांना दुसरे कामच नाही आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे अशा शब्दात सामंत यांनी विरोधकांना सुनावलं आहे. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांना आम्ही सगळ्या आमदारांनी सगळे अधिकार दिले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT