Eknath Shinde : शिंदे सत्तेपासून दूर राहणार; भाजपच्या ऑफरला दाखवली केराची टोपली; उपमुख्यमंत्रिपदासाठी दोन नावं सूचवणार

Eknath Shinde Rejects BJP Offer for Power Sharing: शिंदे दोन आमदारांची नावे उपमुख्यमंत्रीपदासाठी देतील, त्यात एक मागासवर्गीय आणि दुसरा मराठा चेहरा असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास ते पक्षप्रमुखांच्या भूमिकेत काम करताना दिसतील..
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. येत्या दोन-तीन दिवसात महायुती सरकार स्थापन करणार आहे. मुख्यमंत्रीपदावरुन सध्या राजकीय पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या राज्यात ‘काळजी’वाहू सरकार आहेत.

एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री करा, अशी अट केंद्रातील भाजपच्या वरिष्ठांकडे केली आहे. मात्र, त्याला केंद्रानं स्पष्ट नकार दिला असून शिंदेंसमोर भाजपने दोन ऑफर ठेवल्या होत्या. या ऑफर शिंदेंनी धुडकावली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या विलंब होण्याची शक्यता असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Eknath Shinde
Bharat Gogawale : 'कोट' शिवून तयार..असं म्हणणारे भरतशेठ आतातरी मंत्री होतील का?

मुख्यमंत्रीपदाऐवजी एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद अशी ऑफर भाजपकडून देण्यात आली. पण शिंदेंनी या दोनही ऑफरला केराची टोपली दाखवली आहे. उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील मंत्रिपद एकनाथ शिंदे स्वत: घेणार नाहीत, अशी माहिती आहे. यावरुन एकनाथ शिंदे हे स्वत:ला सत्तेपासून दूर ठेवणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

शिंदे आपल्या पक्षातील दोन आमदारांची नावे उपमुख्यमंत्रीपदासाठी देतील, त्यात एक मागासवर्गीय आणि दुसरा मराठा चेहरा असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास ते पक्षप्रमुखांच्या भूमिकेत काम करताना दिसतील,ही शक्यता वर्तवली जात आहे.

Eknath Shinde
Jogeshwari Assembly Elections Result: फेरमतमोजणीसाठी शिवसेना उमेदवाराची कोर्टात धाव; वायकर यांचा पोलिसांवर आरोप

भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. दुसरीकडे शिवसेनेने भाजप पक्षश्रेष्ठींकडे चांगले खाते, गृहमंत्रिपदाची आग्रही मागणी केल्याचे समजते. अजित पवार हे सध्या अर्थमंत्री आहे, हे खाते त्यांच्याकडे असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या नगरविकास खाते आहे. नवीन सरकारमध्ये भाजपला गृह, अर्थ, महसूल आणि नगरविकास ही मलईदार खाती हवी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com