Uddhav and Raj Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेना- मनसे युतीनंतर काहीच तासांतच राजकारण फिरलं; महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष एकत्र

Uddhav Thackeray and Raj Thackeray : महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे जोरदार वारे वाहत आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय हालचालींनी वेग धरला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडत वेगळी चूल मांडण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी आता थेट काँग्रेस,महाविकास आघाडीशी जवळीक साधण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण बदलण्याची क्षमता असलेल्या ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होत नाही, तोच राज्यात पुन्हा दोन मोठे पक्ष एकत्र आले आहेत.

महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे जोरदार वारे वाहत आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय हालचालींनी वेग धरला आहे. भाजपसोबतची युती ही आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं विधान करणाऱ्या रासपचे प्रमुख महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) आता थेट काँग्रेसशीच हातमिळवणी केली आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसची नाराजी पत्करुन उद्धव ठाकरेंनी मुंबईत राज ठाकरेंशी युती केली. ही बाब काँग्रेसला खटकल्याची चर्चा आहे.भाजप-शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे, यांच्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.याचदरम्यान,आता काँग्रेसनंही ठाकरे बंधूंसह महायुतीला शह देण्यासाठी मोठी खेळी केली आहे.

काँग्रेसनं (Congress) आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी (ता.24) संयुक्त पत्रकार परिषदेत युतीबाबतची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं आत्ता कुठं आपले पत्ते ओपन करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे.

रासपच्या युतीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,भाजपा लोकशाहीला संपवत असून हुकुमशाहीच्या विरोधात एकत्र लढल पाहिजे या विचारानं आम्ही एकत्र आलो आहोत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा करत असल्याचं म्हणत त्यांनी नगरपंचायत आणि नगरपरिषदमध्येही रासपची मदत झाल्याचं नमूद केलं. तसेच आगामी काळातही आम्ही सोबत लढू अशी ग्वाही सपकाळ यांनी दिली.

महादेव जानकर नेमकं काय म्हणाले?

रासप अध्यक्ष महादेव जानकर काँग्रेससोबतच्या युतीबाबत भाष्य करताना म्हणाले,देशाचं संविधान वाचवायचं असेल,लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेससोबत राहिलं पाहिजे.म्हणूनच रासपनं काँग्रेससोबत येण्याचा निर्णय घेतला आहे.मला काँग्रेसने बोलावलं नव्हतं,मी स्वत:हून आलेलो आहे. कारण देशासाठी एकत्र लढण्याची गरज असल्याचंही मत जानकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

मागच्या काही काळात मुलं पळवणारी टोळी आलेली होती, आता राजकीय पक्ष चोरणारी टोळी आली असल्याचा टोलाही महादेव जानकर यांनी या पत्रकार परिषदेत लगावला. तसेच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतील 288 जागी जे धोरण होतं, तेच आगामी महानगरपालिका निवडणुकीतही असणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT