Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat Controversy : रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच उद्धव ठाकरेंची पाहिली प्रतिक्रिया; म्हणाले,' भोंदूबाबाच्या भक्तांवर...'

Maharashtra politics News : भोंदूबाबाच्या भक्तांवर कारवाई झाली पाहिजे, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अशोक खरात प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : भोंदूबाबा अशोक खरात यांचे एकानंतर एक कारनामे जनतेसमोर येत आहेत. या सर्व प्रकारामुळे खळबळ माजली असतानाच आता या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केला आहे. भोंदूबाबाच्या भक्तांवर कारवाई झाली पाहिजे, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अशोक खरात प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.

मुंबईत एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी लॉजिस्टिक कोर्स सुरू करण्याच्या उद्देशासह राज्यातील राजकीय परिस्थिती, भोंदूबाबा प्रकरणासह विविध विषयावर भाष्य केले. यावेळी भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून त्यांना सवाल केला असता त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. भोंदू बाबाच्या भक्तांवर कारवाई झाली पाहिजे, या प्रकरणी दोषी असलेल्या कोणालाही सोडू नका, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.

भोंदूबाबा अशोक खरातसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. ओम फट स्वाहा.. म्हणत राज्यातील भोंदूबाबांवर कारवाई झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. अजून किती खालच्या पातळीवर आपण उतरणार आहोत. जादूटोणा विरोधी कायदा आपल्याकडे आहे, पण कायद्याचे पालन करणारेच त्यांच्या नादी लागणार असतील, तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

आम्ही महाराष्ट्रला पुढे नेणार आहोत, हा विषय घेऊन पुढे जातोय. पण, टाचण्या, लिंबाचा विषय समोर आलाय हे योग्य नाही. एपस्टीन फाईलमधून कोणाचं लक्ष उडू नये यासाठी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अनेक फोटो आणि नावे समोर येत आहेत, ज्यांचं कर्तृत्व नाही, त्यांना असे मार्ग घ्यावे लागतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या'

महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही (MVA) या भोंदूबाबाला मदत झाली यासंदर्भातही उद्वव ठाकरेंनी भाष्य केलं. माझं काहीही म्हणणं नाही, तुम्ही सगळ्यांची चौकशी करा. कारण, पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंदू बाबाला पाणी देण्यासाठी केलेल्या मदतीवरूनही स्पष्टीकरण दिले

23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु झालं असून तेव्हाच मी जाहीर केलं होत की, मराठी लोकांसाठी आम्ही एक पाऊल पुढे आणत आहोत. स्थानिक भूमीपुत्रांना दारं बंद होती, त्यामुळे आम्ही नुसती आंदोलन नाही केलं तर प्रशिक्षण वर्गदेखील सुरु केली. सध्या कंपन्यांत कुशल मराठी आणि मुलं लागतात, त्यांना पात्र बनवण्यासाठी आम्ही प्रशिक्षण सुरु केलं आहे. आजकाल लॉजिस्टिक मोठ्या प्रमाणावर आहे. नवी मुंबई एअरपोर्ट आहे, तिथल्या भूमी पुत्रांना संधी असेल तर त्यांना ती मिळाली पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी लॉजिस्टिक कोर्सच्या शुभारंभाचा उद्देश सांगितला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT