Mumbai News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शनिवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना सर्वस्तरातून शुभेच्छा दिलाय जात आहेत. त्यातच शिंदे गटाच्या दोन महिला प्रवक्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी टीकात्मक ट्विट केले आहे.
राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करणाऱ्या आणि लायकी नसलेल्या पातळीवर जाऊन बोलणाऱ्या शीतल म्हात्रे, ज्योती वाघमारे या दोन महिलांनी त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवावी, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्त्या संजना घाडी यांनी प्रत्युत्तर दिले.
दांडा आणि ढुंगणची भाषा करणारी हीच ती बाई का? 2005 मध्ये काय झाले? शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेकांना जी शपथ दिली तेव्हा याच शितल म्हात्रे (Shital Mhatre) होत्या. त्यांना त्या शब्दाचा विसर पडला असावा. बाळासाहेब ठाकरे म्हणालेले माझ्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य यांना सांभाळा. ही जबाबदारी त्या विसरल्या असल्याचेही यावेळी घाडी म्हणाल्या. ( Sanjana Ghadi News)
राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करणाऱ्या आणि लायकी नसलेल्या पातळीवर जाऊन बोलणाऱ्या या दोन महिला आहेत. त्यांच्यावर बोलणं आम्हाला योग्य वाटत नाही. आज त्याच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, ज्यांनी तुम्हाला नगरसेवक केले. वेगवेगळ्या समित्या दिल्या. त्यांच्या मागून मागून तुम्ही राहत होता आणि आज तुम्ही या पद्धतीने बोलत आहात, हे पाहून आश्चर्य वाटत आहे.
राजकीय संस्कृतीचा ऱ्हास यासाठी म्हणते की, कितीही शत्रुत्व असलं तरी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जातात. त्याला उत्तर फक्त एकच आहे. त्यांच्या पोस्टखाली ज्या कमेंट केल्या जातात हेच उत्तर असणार असल्याचे सांगत संजना घाडी यांनी टीका केली.
शिंदे गटात 40 काय 400 डोकी गेली तरी फरक पडत नाही
एकनाथ शिंदे यांच्यासॊबत चाळीस आमदार गेले. कित्येक खासदार गेले. त्यानंतर लोकसभा निवणुकीतील चित्र आपण पाहिले आहे. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यात इतका पाऊस पडतोय. या गर्दीत काही कमी राहिली आहे का ? हा प्रश्न माझा तुम्हाला आहे. ही निष्ठावतांची गर्दी आहे. त्यामुळे 40 काय 400 डोकी जात असतील तर सामान्य जनता आणि निष्ठावंत शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे संजना घाडी यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.