Uddhav Thackeray on Devendra Fadnavis  Sarkarnama
महाराष्ट्र

flight meeting : माझ्यात आणि फडणवीस यांच्यात दुसऱ्यांचाच गोंधळ : उद्धव ठाकरेंकडून मैत्रीसाठी आणखी एक सूचक विधान

Maharshtra Political News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे त्या सहा खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा उद्धव ठाकरे करीत आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : दोन दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर जात असताना मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास विमानाने केला. दुसरीकडे त्याचवेळी या विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रवास करीत होते. या प्रवासावेळी काही बोलणे झाले नाही मात्र उतरल्यानंतर ते शेकहँड करून निघून गेले. मात्र, प्रसारमाध्यमात हा विमानप्रवास जोरदार रंगला आहे. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. त्यातच याविषयी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मोठा खुलासा केला आहे. त्याशिवाय माझ्यात आणि फडणवीस यांच्यात दुसऱ्यांचाच गोंधळ सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील (Shivsena) सहा खासदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे त्या सहा खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा उद्धव ठाकरे करीत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे या विमान प्रवासावरून सत्ताधारी व विरोधक एकमेकांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे हा वाद चांगलाच रंगला आहे. त्यातच ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम सुरु असून फडणवीस यांच्या खुर्चीचे रक्षण करा, अशी दोन विधाने उद्धव ठाकरे यांनी केली होती.

पत्रकार परिषदेवेळी उद्धव ठकरे (Uddhav thackerayd)यांना सीएम देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तो त्यांचा प्रश्न आहे… मी त्यांचा हितचिंतक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मनातली बात मी करतोय. पुढाकार घेण्याबाबत माझ्याकडे काही नाहीये त्यांच्याकडे ऊपरवाले की मर्जी आहे. विमान प्रवासावेळी फडणवीस आणि मी दोन दोन कोपऱ्याला झाल्यामुळे मधले जे सगळे गोंधळ घालतात ते त्यांच्या लक्षात येत नाही.

सीएम फडणवीस यांनी पंतप्रधान पदाची इच्छा व्यक्त केली तर तुम्ही पाठिंबा द्याल का? या प्रश्नाचे उत्तर देताना ठाकरे म्हणाले, आता जर देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आणि जाहीर केलं की पंतप्रधान पदाची ते तयारी करतात ते राहतील का पक्षात? आता देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान पदाची तयारी करत आहे. हे जाहीर करणे म्हणजे आत्मघात करणं आहे. 2029 ला तुम्ही प्रश्न विचारा त्यावेळी उत्तर मी देईल. जेव्हा ते जाहीर करतील तेव्हा मी त्याच्यावर उत्तर देईल. जर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसत असेल तर शिवसेना सोबत का नको राह्याला? महाराष्ट्राचा माणूस पण गद्दार नाही.

फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची धोक्यात येऊ शकते असे तुम्ही म्हणाला? यावर ठाकरे म्हणाले, 'फडणवीस यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते हे मी तुम्हाला उदाहरणासह सांगितले. नितीन गडकरी, शिवराज सिंह चव्हाण यांची उदाहरणं दिली. देवेंद्र फडणवीस यांना देवा भाऊ म्हणतात तसे शिवराज सिंह चव्हाण यांना मामा म्हणायचे. त्यांना वाटत होतं शिवराज मामा पंतप्रधान पदाचा चेहरा होऊ शकतात, त्याच्यामुळे त्यांना वरती दिल्लीत घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT