Sarkarnama Exclusive : ओम राजेनिंबाळकर आधी मतदारसंघात जाणार... दिवसही ठरला : बंडखोरी करण्यापूर्वीचा सगळा प्लॅनच सांगितला

Dharashiv shivsena News : येत्या दोन दिवसात मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मते जाणून घेऊन पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
MP Omprakash Rajenimbalkar
MP Omprakash Rajenimbalkar sarkarnama
Published on
Updated on

Pune news : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार त्यांची साथ सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या दोन दिवसापासून सस्पेन्स आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने बोलावलेल्या बैठकीला ते हजर नव्हते तर दुसरीकडे सहा बंडखोर खासदारांनी केलेल्या पत्रावर माझी स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता लागली असतानाच त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना मोठे विधान केले आहे. येत्या दोन दिवसात मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मते जाणून घेऊन पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MP Omprakash Rajenimbalkar
Omprakash RajeNimbalkar news : ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या बंडाचे मतदारसंघात जोरदार पडसाद; नगरसेवकांनी उचललं मोठं पाऊल...

'सरकारनामा'शी बोलताना खासदार ओम राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) यांनी स्पष्ट केले की, 'माझ्या दृष्टिने पवन राजेनिंबाळकर हत्याकांडाचा निकाल महत्त्वाचा आहे. 20 जूनला या प्रकरणाचा मुंबई हायकोर्टात निकाल लागणार आहे. हा निकाल लागल्यानंतर मी धाराशिव मतदारसंघात जाणार आहे. त्यानंतर मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांचे मते जाणून घेणार आहे. त्यानंतर भविष्याकाळातील राजकीय वाटचालीविषयी अंतिम निर्णय घेणार आहे.'

MP Omprakash Rajenimbalkar
Omprakash RajeNimbalkar news : ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या बंडाचे मतदारसंघात जोरदार पडसाद; नगरसेवकांनी उचललं मोठं पाऊल...

गेल्या काही दिवसापासून ओम राजेनिंबाळकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र अद्याप मी राजकीय दृष्ट्या कुठलाच निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट करतानाच येत्या काळात माझ्या कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहे. त्यानंतर बैठकीत ठरेल त्याप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MP Omprakash Rajenimbalkar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांचे उदय सामंत यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन; पण मतदारसंघात शिवसेनेची पिछेहाट झाल्याचीही कबुली!

दरम्यान, एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार केला तर चुकीचा वाटतो. मात्र, राजकीय दृष्टीने विचार केला तर बरोबर आहे. सध्या मी मोठ्या धर्म संकटात आहे. इमोशनली विचार केला तर पाऊल चुकीचे वाटते, पण पॉलिटिकल विचार केला तर तेच बरोबर असल्याचे खासदार राजेनिंबाळकर म्हणाले.

MP Omprakash Rajenimbalkar
Dharashiv politics: धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्कप्रमुख उन्मेष पाटलांनी लावला कामाचा सपाटा; थेट दिल्लीतूनच लावली फिल्डिंग

गेल्या काही दिवसापासून काम करीत असताना एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करावा यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे. मात्र घाई गडबडीत कोणताच निर्णय घेणार नाही. वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे. तर दुसरीकडे पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या आणि वाय प्लस सुरक्षा मिळाल्याच्या चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले.

MP Omprakash Rajenimbalkar
Uddhav Thackeray : जिल्हाप्रमुख पद नाकाराल्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली, माजी महापौर आता एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com