Shivsena News : केंद्रात शिवसेनेच्या वाट्याला आणखी दोन मंत्रीपदे येणार; फुटलेल्या खासदारांमधील 'ही' नावे चर्चेत

Political News : शिवसेनेत सहा खासदारांनी प्रवेश केल्याने शिवसेनेचे संख्याबळ आता 13 इतके झाले आहे.
Eknath Shinde appoints woman leader to key post
Eknath Shinde appoints woman leader to key postSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत सहा खासदारांनी प्रवेश केल्याने शिवसेनेचे संख्याबळ आता 13 इतके झाले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना हा दोन नंबरचा पक्ष झाला आहे. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर चांगलीच वाढली आहे. त्यातच आता 5 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन होत असून त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदे मिळणार असून त्या पदासाठी ही नावे चर्चेत आहेत.

सोमवारी दुपारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले होते. यावेळी सहा खासदारसोबत एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे समजते.

Eknath Shinde appoints woman leader to key post
Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी; दिल्लीतील नेते खूश; भाजपची शिंदेंना CM पदाची ऑफर? ठाकरेंच्या निकटवर्तीय माणसाच्या ट्विटमुळे खळबळ

त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला 2 मंत्रिपद मिळणार असल्याचे समजते. एनडीएमध्ये (NDA) शिवसेनेच्या खासदारांची संख्या आता 13 होणार आहे. त्यामुळे केंद्रामध्ये एकनाथ शिंदे यांचे वजन वाढणार आहे. यामुळेच आता शिंदे गटाला 2 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Eknath Shinde appoints woman leader to key post
Shivsena News: बंडखोर खासदारांनी धनुष्यबाण हाती घेताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; 2029 च्या निवडणुकीची दाखवली झलक; 'ऑन दि स्पॉट' उमेदवारी जाहीर

त्यामध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट तर एक राज्य मंत्रिपद मिळणार आहे. कॅबिनेट मंत्रिपद ज्येष्ठ खासदार असेलल्या श्रीरंग बारणे अथवा श्रीकांत शिंदे यांना मिळू शकते तर केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून असेलल्या दोन खासदारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये दोघांना दीड दीड वर्षे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सुरुवातीचे दीड वर्ष परभणीचे खासदार संजय जाधव यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर उर्वरित दीड वर्षांसाठी धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्यामुळे आतापासूनच उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.

Eknath Shinde appoints woman leader to key post
Shivsena Vardhapan Melava: खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंची वर्धापन दिनाच्या दिवशीच मोठी घोषणा; म्हणाले,...तर मी आज शिवसेनेचं पक्षप्रमुख सोडतो!

येत्या काही दिवसांतच मोदी सरकारमध्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या खासदारांची संख्या वाढल्याने वाट्याला आणखी दोन मंत्रिपद येणार आहेत. सध्याच्या घडीला बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव हे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत. आता या खासदारांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे आता लवकरच होत असेलल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेसेनेला लॉटरी लागणार आहे, त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde appoints woman leader to key post
Shivsena News: बंडखोर खासदारांनी धनुष्यबाण हाती घेताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; 2029 च्या निवडणुकीची दाखवली झलक; 'ऑन दि स्पॉट' उमेदवारी जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com