Uddhav Thackeray News Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : 'उद्धव ठाकरेंना संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला महाराष्ट्र्र गाडल्याशिवाय राहणार नाही'

Sachin Waghmare

Mumbai News :आमच्याकडील सडलेली पाने जी आम्ही उपयोगी नसल्याने टाकून दिली होती. ते सर्व तुमच्याकडे आली आहेत. हा आमच्याकडील उरलेला सर्व कचरा तुम्ही एकत्र जमवला आहे. त्या सर्वांना एकत्रित करीत भाजपने प्रवेश दिला आहे. त्यामुळे भाजप नव्हे तर हा कचरा जमविणारा पक्ष झाला आहे. महाराष्ट्रातील जनता कधीच अन्याय करण्याच्या पाठीशी उभी राहत नाही. कोण अन्याय करीत असेल तर पेटून उठते. उद्धव ठाकरेंना संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला महाराष्ट्र्र गाडल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

मुंबई महाविकास आघाडीच्या (MVA) प्रचाराच्या समारोपासाठी बीकेसी मैदानावर गुरुवारी सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवाना म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात करीत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. (Uddhav Thackeray News)

महायुतीच्या सभेत सर्वच भाडोत्री व गद्दार जमा झाले आहेत. इकडे कोणीच भाडोत्री अथवा गद्दार नाही सगळे भाडेकरू तिकडच्या सभेला गेले आहेत.मला काही जणांची किंवा येते आज इकडे असतात उद्या तिकडे असतात अशी ही मंडळी आहे.

४ जूननंतर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसणार आहेत. हे आता सर्वानीच ठरविले आहे. ही समारोपाची सभा असली तरी ही महाविकास आघाडीच्या यशाची नांदी ठरणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रचारसभेवेळी मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी प्रत्येक गोष्टीची गॅरंटी मोदी देत आहेत. मात्र, ही लढाई सर्वांची आहे. स्वातंत्र्य पाहिजे का गुलामी पाहिजे हे तुम्हीच ठरवा. येत्या काळात मोदींची लाचारी संपविण्याची गरज आहे. त्यामुळे आता येत्या काळात मशाल पेटवून पाठीशी उभे राहा.

प्रत्येक ठिकाणी माझ्या सभेला गर्दी होत आहे. प्रत्येकजण हुकूमशाहाला गाडा असे सांगत आहेत. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे रहा. मी कधीच हिंदू-मुस्लिम असा भेदभाव केलेला नाही, करणार नाही. ईदच्या दिवशी कधीच आमच्या घरी चूल पेटली नाही, सर्व काही जवळच्या मुस्लिम कुटुंबाकडून येत होते, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

SCROLL FOR NEXT