Uddhav Thackeray News : '4 तारखेला फक्त नरेंद्र मोदी राहतील, 'डीमोदीनेशन', उद्धव ठाकरे काय म्हणाले...

Loksabha Election : गद्दाराच्या मुलाला तिकीट देता. मात्र, ज्या प्रमोद महाजनांनी भाजपची पाळंमुळं रुजवण्यासाठी मेहनत घेतली त्यांच्या मुलीला पूनमला तिकीट नाकरलं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Narendra Modi, Uddhav Thackeray
Narendra Modi, Uddhav ThackeraySarkarnama

Loksabha Election 2024 : कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी भरपावसात उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. पंतप्रधान मोदी यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला ठाकरे काय उत्तर देतात याकडे लक्ष होते. उद्धव ठाकरेंनी देखील मोदींनी डिमॉनिटायझेशन केल्याची आठवण करून देत चार तारखेला डिमोदीनेशन करणार असल्याची टीका केली.

Narendra Modi, Uddhav Thackeray
Bhavesh Bhinde Arrested: मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

'या चार तारखेला तुम्ही नरेंद्र मोदी असाल पण पंतप्रधान नसणार. चलनी नोटांचे डिमॉनिटायझेशन तुम्ही केले होते.तसे चार तारखेला आम्ही डीमोदीनेशन करणार आहोत', असा टोला उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना Narendra Modi लगावला. जोरदार टीका केली. घराणेशाहीवर आपल्यावर भाजपवाले टीका करतात मात्र कल्याणमध्ये गद्दाराच्या मुलाला तिकीट दिलं जातं, ती घराणेशाही नाही का? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'गद्दाराच्या मुलाला तिकीट देता. मात्र, ज्या प्रमोद महाजनांनी भाजपची पाळंमुळं रुजवण्यासाठी मेहनत घेतली त्यांच्या मुलीला पूनमला तिकीट नाकरलं. गद्दाराच्या मुलाला तिकीट देताय. पण पूनमला दिलं नाही. मोदींनी महाराष्ट्रात 25 सभा घेतल्या. प्रत्येक सभेत ते रामाचा जप करत नाहीत तेवढा उद्धव ठाकरेंचा करत आहेत.', असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही भाजपसोबत 25 वर्ष होतो. त्यांच्यामध्ये विलीन नाही झालो तर काँग्रेसमध्ये काय होणार? आम्ही हिंदुत्ववादी नाही तुम्ही म्हणता पण तुम्ही ज्यांच्यासोबत आहात ते आंध्रप्रदेशमधील चंद्रबाबू नायडू हिंदुत्ववादी आहेत का? नितीशकुमार हिंदुत्ववादी आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

Narendra Modi, Uddhav Thackeray
Chhagan Bhujbal News : बाळासाहेबांसोबत तुम्ही असं का केले ? भुजबळांनी घेतली पुन्हा उद्धव यांची बाजू; राज ठाकरेंना म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com