Uddhav Thackrey Vs Narendra Modi : उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची काही तासांतच करणार परतफेड!

Nashik Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे आणि शरद पवारांच्या होणार स्वतंत्र सभा
Narendra Modi, Uddhav Thackeray
Narendra Modi, Uddhav ThackeraySarkarnama

Nashik News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना आणि मतदारसंघातील उमेदवारांना घेण्याचे नियोजन महाविकास आघाडीने उत्तमप्रकारे केले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यात यशदेखील आले आहे. आजवर झालेल्या चार टप्प्यांतील मतदानातून महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात महायुतीला चोख राजकीय उत्तर देण्याचे काम आघाडीने केले. बुधवारी (ता.15) नाशिकमध्ये देखील त्याची प्रचिती येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा उद्या पिंपळगाव बसवंत येथे होत आहे. हा मतदारसंघ कांदा उत्पादक आणि शेतकरीबहुल आहे. शेतकरी आणि कांदा उत्पादक यांच्या प्रश्नांचीच चर्चा आजवरच्या प्रचारात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २००९ आणि २०१४ या निवडणुकांमध्ये याच ठिकाणी सभा घेऊन कांदा उत्पादकांना आश्वासने दिली होती. या पार्श्वभूमीवर उद्या ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही घेरण्याचा प्रयत्न करतील. त्या दृष्टीने भाजपने या सभेसाठी सर्व ताकद पणाला लावली आहे.

Narendra Modi, Uddhav Thackeray
Shambhuraj Desai News : शंभूराज देसाईंची तत्परता, प्रचारात व्यस्त असूनही मतदारसंघातील नुकसानीची केली पाहणी...

पंतप्रधान मोदी यांची सभा दिंडोरी आणि नाशिक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी आवश्यक आहे. मात्र, मोदी यांच्या आरोप आणि मुद्द्यांना उत्तर देऊन त्याची लगेचच परतफेड करण्याची व्यवस्था महाविकास आघाडीकडून होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांची सभा साधारणपणे दुपारी दोन ला सुरू होऊन चार पर्यंत संपेल. सायंकाळी पाचला शरद पवार (Sharad Pawar) यांची याच मतदारसंघात वणी येथे सभा असेल. पवार प्रामुख्याने शेतकरी आणि कांदा उत्पादक यांच्या बाजूने लढत आले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना उत्तर देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लगेचच होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी सायंकाळी नाशिक येथे सभा होत आहे. या सभेच्या तयारीसाठी शिवसेनेने झोकून देऊन काम केले आहे. त्यामुळे ही सभा नरेंद्र मोदी यांना उत्तर असेल. ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्या प्रश्नांना लगेचच उत्तर देऊन त्यांची परतफेड करू शकतील. तशी संधी योगायोगाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उपलब्ध झाली आहे.

नाशिकमध्ये उद्या विविध प्रमुख नेत्यांच्या सभांमुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. त्याला रंजक राजकीय किनार देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी होणाऱ्या सभांकडे मतदार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Narendra Modi, Uddhav Thackeray
Narendra Modi : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी निफाडमध्ये होणार मोदींची प्रचारसभा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com