Mumbai News: विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री व प्रहार संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश करण्याच्या अटीवरच कडू यांना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली होती.
विधानसभेतील पराभवानंतर राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या बच्चू कडूंनी ही अट मान्य करत शिवसेनेत प्रवेश करत आमदारकी पदरात पाडून घेतली. या सर्व घडामोडींवर पहिल्यांदाच बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंना जुनी आठवण करुन देत जोरदार हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी (ता.22) मातोश्रीवरुन माजी मंत्री व विधानपरिषदेचे शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंवर टीकेची झोड उठवली आहे.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पक्षात प्रवेश करत आमदारकी मिळवल्यामुळे नाराज झालेल्या प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरत पक्षप्रवेश केला आहे. मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर,विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे उपस्थित होते.
धाराशिव,परभणी,सोलापूर या जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर खोचक टीका केली.
ठाकरे म्हणाले,बच्चू कडू याला घरी बोलावून मंत्री केला, ही माझी चूक झाली. पण जे लोभापायी गेलेत ते जाऊ द्या, असा जिव्हारी लागणारा वार त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद असल्याची भावना व्यक्त केली.
तर बच्चू कडू् यांनी शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर आपण कोणत्या मंत्रिपदासाठी किंवा पदरात काही पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला नसल्याचं कडू म्हणाले होते. तसेच आपल्याला जर त्यांच्याकडे काही मागायचंच असतं, तर गुवाहाटीलाच मागितलं असतं.पण आपण कोणत्याही पदासाठी नाही, तर दिव्यांग मंत्रालयासाठी आपण सरकारशी पंगा घेतल्याचंही कडू यांनी सांगितलं होतं.
महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बच्चू कडूंना राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. पण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी कडूं हे ठाकरेंसोबत राहतील अशी सर्वांना अपेक्षा होती. पण कडू यांनीही शिंदेंना समर्थन देत त्यांच्यासोबत गुवाहाटीला गाठली. त्यानंतर कडूंनी आता विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेत प्रवेश करत आमदारकी मिळवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.