

Maratha Reservation News : भाजपाचे आमदार प्रसाद लाड हे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आज भेटले. काल (गुरुवारी) रात्री छत्रपती संभाजीनगरमधील एका हाॅटेलमध्ये मुक्कामी थांबले.
दरम्यान, काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद लाड यांना फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर लाड ज्या हाॅटेलमध्ये थांबले तिथे घुसून त्यांच्यावर शाई फेकण्याचाही या कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता, अशी माहिती स्वतः लाड यांनीच दिली.
जरांगे पाटील-लाड यांच्या चर्चेत जेव्हा हा विषय समोर आला तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी ते कोण आहेत, कोणत्या संघटनेचे आहेत हे ही मला माहित नाही. पण तुम्ही मोठे भाऊ म्हणून त्यांना माफ करावे. ते समाजासाठी भांडत आहेत, त्यांचा नेमका काय हेतू होता? हे मला माहित नाही. पण राजकारण्यांनी थोडं मनं मोठं केलं पाहिजे, असे जरांगे पाटील म्हणाले.
प्रसाद लाड यांनी आपल्याला धमकी देणाऱ्या किंवा हाॅटेलमध्ये घुसून शाई फेकण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी कुठलीही करावाई करू नये, किंवा त्यांच्यावर गुन्हाही दाखल करू नये, असे आवाहन माध्यमांशी बोलताना केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीतही प्रसाद लाड यांनी याचा आवर्जून उल्लेख केला. छत्रपती संभाजीनगर पोलीसांनी मात्र या धमकी आणि हाॅटेलमधील घुसखोरी प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे.
30 मेपासून मनोज जरांगे पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने भाजपाचे आमदार व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे प्रसाद लाड आज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवालीत दाखल झाले.
मात्र या भेटीपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये प्रसाद लाड थांबले असताना दोघांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्याआधी प्रसाद लाड यांच्या पीएला धमकीचा फोनही आला होता. या प्रकरणी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.