Rajendra Raut : राजेंद्र राऊतांचा 5 दिवसांपासून मुंबईत मुक्काम : मुख्यमंत्र्यांसह 3 बड्या नेत्यांची घेतली भेट; बार्शीत 'फिक्स आमदारकी'चे मेसेज व्हायरल

Solapur Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांकडून जोरदार हालचाली सुरू असून, राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.
Rajendra Raut
Rajendra Raut Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 May : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोलापुरातून माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, प्रांतिक सदस्य शहाजी पवार यांची नावे चर्चेत आहेत. इच्छुकांकडून पक्षाच्या हायकमांडकडे फिल्डिंग लावली जात आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे तर सोमवारपासून (ता. 18 मे) मुंबईत तळ ठोकून आहेत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. मुंबईत घडामोडी असताना बार्शीतही ‘राजेंद्र राऊत यांची आमदारकी फिक्स’ असे मेसेज फिरत आहेत, त्यामुळे विधान परिषदेसाठी जोरदार मोर्चोबांधणी होताना दिसत आहे.

माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून आळखले जातात. विधानसभा निवडणुकीत जागावाटपात बार्शीची जागा शिवसेनेकडे होते, त्यामुळे निवडणुकीच्या काळात राऊत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर लगेच भाजपची सर्वाधिक सदस्य नोंदणी करत आपण भाजपत असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले होते.

मागील पंधरा दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस हे राऊत यांच्या आग्रही निमंत्रणामुळे बार्शीत (Barshi) आले होते. त्या वेळी त्यांनी विविध घोषणा केल्या होत्या. त्याचवेळी त्यांना राऊतांच्या विधान परिषदेबाबत विचारण्यात आले होते. आमदारकी मिळावी, अशी पक्षीय कामगिरीही राऊत यांनी केली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत पराजय झाल्यानंतर राऊत हे जोमाने कामाला लागले होते. त्यानंतर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी नगरपालिका त्यांनी जिंकली होती. तसेच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वच सर्व जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणत राऊतांनी विक्रम नोंदविला होता. त्याची बक्षिसीही जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून बार्शी तालुक्याला मिळाली आहे.

Rajendra Raut
MLC Election : स्वीकृत सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा चेंडू विभागीय आयुक्तांच्या कोर्टात; निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष, सोलापुरात 616 जण मतदान

बार्शीच्या इतिहासात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद प्रथमच तालुक्याला मिळाले आहे. मात्र, तो मुद्दा राजेंद्र राऊत यांच्यासाठी कळीचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर मात करण्यासाठी राऊत यांनी पक्षनेतृत्वाच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि इतर भाजप वरिष्ठ नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी घेतल्या आहेत. राजेंद्र राऊत सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवार मिळणार का, याबाबत सोलापूर जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता आहे.

Rajendra Raut
Sangli Politics : जयंत पाटलांचा गट फुटणार, गोपीचंद पडळकरांचा दावा; म्हणाले, 'पावडर लावलेला चेहरा लवकरच...'

राजेंद्र राऊत सध्या मुंबईत उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. दुसरीकडे, बार्शीत राजेंद्र राऊत यांच्या फिक्स आमदारकीचे मेसेज समर्थकांच्या सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. ‘राजेंद्र राऊत यांची आमदारकी फिक्स, माजी नव्हे आजी आमदार’ असे मेसेज राऊत यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. त्यामुळे राऊतांन आमदारकीची लॉटरी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com