Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : ठाकरेंचं ठरलं; मॅरेथॉन बैठकीत 100-105 जागांवर एकमत

Political News : सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप सध्या गेल्या तीन दिवसापासून सुरु आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. बुधवारी पितृपक्ष संपल्यानंतर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षाकडून वेगाने तयारी केली जात आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.

सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप सध्या गेल्या तीन दिवसापासून सुरु आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचा (MVA) फॉर्म्युला ठरला आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट 100 ते 105 जागा लढवणार असल्याचे समजते.

ठाकरे गटाच्या विधानसभानिहाय आढावा बैठका नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये गेल्या 10 दिवसात मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात आल्या.

मुंबई विधानसभा मतदार संघाची बैठक लवकरच मातोश्रीवर पार पडणार आहेत. एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठका पार पडत असताना दुसरीकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरे यांनी स्वतः उपस्थित राहून आढावा घेतला. (Uddhav Thackeray News)

ज्या पक्षाला ज्या मतदार संघात अनुकूल वातावरण असेल तो मतदार संघ त्या पक्षाला सोडण्याचे नेत्यांमध्ये एकमत झाले. त्यासोबतच काही जागांबाबत आणखी चर्चा होणे अपेक्षित आहे. ज्या मतदार संघात एकापेक्षा अधिक पक्ष इच्छुक असतील त्यावर वरिष्ठ नेते येत्या दोन दिवसात तोडगा काढणार आहेत.

त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ त्याच पक्षाला मिळणार असल्याची महिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसात महाविकास आघाडीचे चर्चा वाटप पूर्ण होणार आहे. त्यानंतर लवकरच उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT