Rohit Pawar : आमदार पवारांनी सरकारला विनंती केली; सरकार किती मनावर घेणार?

MLA Rohit Pawar requested the state government regarding the state service recruitment : आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षांच्या घोळावरून राज्य सरकारकडे मागणी करणारा व्हिडिओ त्यांच्या 'एक्स' खात्यावर शेअर केला आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्पर्धा परीक्षांमधील घोळ आणि त्यात बदलत असलेल्या धोरणांमुळे विद्यार्थी मेटाकुटीला आला आहे. यावेळी राज्य सेवेची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची शेवटची असणार आहे.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे विनंती करत विद्यार्थ्यांची मागणी मांडली आहे. तसा व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर केला आहे. आमदार पवारांची ही विनंती सरकार किती मनावर घेईल, हे आताच सांगता येणार नाही.

यंदाची राज्यसेवा परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची शेवटीची असणार आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षेत सर्वच 35 संवर्गाचा समावेश करून DYSP, तहसीलदार यासारख्या सर्वच पदांची मोठी जाहिरात असावी, तसेच कंबाइन परीक्षेची जाहिरात भरघोस पदासह लवकरात लवकर म्हणजेच, आचारसंहिते अगोदर काढवी, अशी विद्यार्थ्यांच्या मागणीकडे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी लक्ष वेधलं आहे.

Rohit Pawar
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल दोन दिवसांत सरकारी निवासस्थान सोडणार

आमदार पवार यांनी सरकार गंभीर असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांचा अंत न पाहता सकारात्मक विचार करावा, अन्यता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. अभ्यास करणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमार्फत पद भरती वाढवण्यासाठी सरकारकडे करत असलेल्या पाठपुराव्याकडे देखील आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधलं.

Rohit Pawar
Raj Thackeray : ...असल्यांचा महाराष्ट्रात सुळसुळाट झालाय! महात्मा गांधी जयंतीदिनी राज ठाकरेंचे फटकारे

आमदार पवार म्हणाले, "महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. या अभ्यासाठी विद्यार्थी मोठी शहरं मुंबई, पुणे (PUNE) , छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर आदी भागात गेली आहेत. तिथं राहणं परवडत नाही. राज्यसेवेची ऑब्जेक्टिव्हपद्धतीची ही शेवटची परीक्षा आहे. आतापर्यंत अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांची मागणी, अशी आहे की, ऑब्जेक्टिव्हपद्धतीने अभ्यास केला आहे. पण या परीक्षा वेळेवर घ्याव्यात".

बिहार पुढं जात आहे

'पदभरती कमी जागांची निघाली आहे. संवर्ग 35 असताना 18 संवर्गांसाठी जागा निघाल्या आहेत. बाकी 17 संवर्गांच काय? DYSP पदाची एकही जागा निघालेली नाही. उपजिल्हाधिकारी पदाच्या सहा जागा निघाल्या आहेत. बिहारशी तुलना केल्यावर तहसीलदाराच्या 136, DYSP 200 जागा निघाल्या आहेत. महाराष्ट्रात एकही निघालेली नाही. बिहार पुढं चालला आहे. पण महाराष्ट्र जिथं आहे, तिथंच आहे. मागणीपत्र गेलेलं नाही. पदभरतीची 2024 ची वाट बघितली जात आहे. सरकार गप्पा मारत आहे 2025च्या! हातात जे अगोदर आहेत, ते पूर्ण करा. 2025 नंतर बघू. ती तुम्हाला संधी मिळणार नाही. तिथं आम्ही आहोत सक्षम. महाविकास आघाडी 2025च्या जागांबाबत बोलायला. 2024 ला शब्द दिला होतो, सर्व संवर्गांचा तो पूर्ण करा. ही कार्यवाही आचारसंहिता लागण्यापूर्वी करावी. कंबाइनचा प्रश्न तसाच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विभागाचं मागणीपत्र गेलेले नाही. एवढं आपण बिझी नाही. अधिकाऱ्यांना मागणीपत्र पाठवायला सांगा. या परीक्षा वेळेवर होणे गरजेचे आहे', असे रोहित पवार यांनी म्हटलं.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत राजकारण नको

'भाजपच्या नेत्यांना पुण्यात एक कार्यक्रम घेऊन काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेळ मिळत नाही. आॅनलाईन सभा घेतात. यात काय रखडतंय, तर मुला-मुलींचे भविष्य, संधी रखडते. कशा कार्यक्रमाची वाट बघायची. राजकारण करावं, ते राजकारणाच्या ठिकाणी. मुलांच्या भवितव्याबद्दन राजकारण नको, ही विनंती आहे. सर्व 35 संवर्गांच्या जागा काढून बिहारला याबाबत मागे टाकण्याचा विचार करावा. विकासात इतर राज्य पुढं चालले आहेत', असेही रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com