Uddhav Thackeray Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

काल ऑफर आज भेट : 24 तासांच्या आता ठाकरे-फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meeting : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी घडामोडी होताना दिसत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Aslam Shanedivan

थोडक्यात बातमी :

  1. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्यामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होणार का, याची चर्चा रंगली आहे.

  2. गेल्या काही दिवसांत ‘ऑफर’ आणि ‘बोलणी’ संदर्भात अफवा सुरू असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

  3. राजकारणात कट्टर विरोधकांमध्ये दोस्तीचं वळण आल्याचा हा संभाव्य संकेत असू शकतो.

Mumbai News : राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकतं. जो कट्टर शस्त्रू आहे तो जिगरी दोस्तही होऊ शकतो. सध्या अशीच घटना राज्याच्या राजकारण घडत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (ता.17) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून काल ऑफर आज भेट अन् चर्चाही नेमकं काय सुरू आहे? असा सवाल आता राज्यात चर्चीला जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील होते. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तासाची चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनामध्ये अर्धा तास चर्चा झाली. यामुळे राज्यात खळबळ उडाली असून वेगवगळे तर्क वितर्क लावले जात आहे.

तसेच सभापतींच्या दालनात दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबबात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. बुधवारी (ता.16) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेना आमदार अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर आता किमान या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेतेपद भरले जावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. याच मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा झाल्याची चर्चा आहे. तसेच या बैठकीच्या आधी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांसोबत चर्चा केली होती.

बुधवारीच फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपसमारंभात जोरदार फटकेबाजी केली होती. त्यांनी विधानपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांना थेट सत्ताधारी बाकावर या, सत्तेत सहभागी व्हा, असे निमंत्रण दिले होते. त्यांनी, उद्धवजी आम्हाला 2029 पर्यंत तिकडे येण्याचा स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे स्कोप आहे, तुम्ही येऊ शकता असे म्हटलं होते. आता या ऑफरला 24 तासही होत नाही तोच आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आले आहे.

काँग्रेसचे सपकाळही भेटीला

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात दाखल झाले असून जनसुरक्षा विधेयकाबाब राज्यपालांची भेट घेण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. याचीच चर्चा करण्यासाठी ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

प्र. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट कशासाठी होती?
उ: अद्याप याचे अधिकृत कारण समोर आलेले नाही, पण ही भेट राजकीय चर्चा आणि युतीच्या शक्यतेवर आधारित असल्याचे मानले जाते.

प्र. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का?
उ: सध्या यावर फक्त चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

प्र. ही भेट राज्याच्या राजकारणावर काय परिणाम करू शकते?
उ: ही भेट महत्त्वाची राजकीय घडामोड ठरू शकते आणि भविष्यातील युतीचे संकेत देऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT