Raj-Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची चूक यावेळी राज ठाकरे करतायत? युतीच्या बोलणीत मनसे अजूनही 'नॉट इंट्रेस्टेड'

MNS alliance updates News : युतीच्या बोलणीसाठी अद्याप मनसेने पुढाकार घेतला नसल्याने दोन्ही बाजूच्या सैनिकांची धाकधूक वाढली आहे.
Uddhav Thackeray Raj Thackeray
Uddhav Thackeray Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसेचे इगतपुरीमध्ये अधिवेशन झाले. यात राज ठाकरे सगळ्या मुद्द्यांवर बोलले पण युतीवर बोलले नाहीत. सुरुवातीपासून राज ठाकरे युतीबाबत डिफेंन्सिव्ह भूमिकेत आहेत. विजयी मेळाव्यातही राज ठाकरे युतीबाबत फारसे काही बोलले नाहीत. त्यांनी पदाधिकाऱ्यांनाही माध्यमांशी न बोलण्याचा आणि सोशल मिडीयावर मत न मांडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे मात्र सुरुवातीपासून युतीबाबत पॉझिटिव्ह बोलत आहेत. मनसेचे नेते सातत्याने उद्धव ठाकरे यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलत होते. पण संजय राऊत सतत युतीसाठी खतपाणी घालत होते.

गेल्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) युतीच्या चर्चा चालू होत्या तेव्हाचा एक प्रसंग राज ठाकरे, संदीप देशपांडे नेहमी सांगत होते. एक वेळा नव्हे तर दोनवेळा शिवसेना व मनसेत चर्चा सुरु होती. मात्र, प्रत्यक्षात युती झाली नाही. त्यामुळे यावेळेस आतापर्यंत उद्धव ठाकरे जे चूक करीत होते. ती चूक राज ठाकरे करीत आहेत. युतीच्या बोलणीसाठी अद्याप मनसेने पुढाकार घेतला नसल्याने दोन्ही बाजूच्या सैनिकांची धाकधूक वाढली आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray
BJP Politics : नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 40 कोटींचा घोटाळा? सचिवच बनला भ्रष्ट? भाजपचे आमदार आक्रमक

2014 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच 25 वर्षांपासून असेलेली शिवसेना-भाजपची युती तुटली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दाखवली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलणेही झाले होते. त्यासाठी अर्जवाटपही थांबवलं होतं. पण त्यानंतर उद्धवनं प्रतिसादच दिला नाही. साधा फोनही केला नाही. त्यामुळे त्यांची युती झाली नाही.

Uddhav Thackeray Raj Thackeray
NCP Politics : राजकीय मतभेदानंतर अनेक वर्षांनी उंडाळकर बंधू आले एका व्यासपिठावर : कारण काय वाचा...

शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर दैनिक सामनाचे वितरक बाजीराव दांगट राज ठाकरेंच्या घरी गेले होते. तुम्ही एकत्र यायला हवे. मी उद्धवशी बोलतो, असे म्हणाले. मी होकार दिला. म्हटले बोला. त्यानंतर त्याच रात्री दांगटांच्या फोनवरून उद्धवचा फोन आला. विचारपूस झाल्यानंतर उद्धवने भाजपचा विषय काढला. फसवणूक झाल्याचे म्हणाला. त्यावर मी म्हणालो, मला जे बाहेर राहून कळत होते, ते तुला आत राहून कळले नाही. बरे मग आता काय करायचे, अशी विचारणा केली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी तीन पर्याय ठेवले होते.

एकतर आपण चर्चा करायची. दुसरे म्हणजे निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत आणि तिसरा पर्याय निवडणुकीनंतर काय तो निर्णय घ्यायचा. अर्ज भरायला दोनच दिवस बाकी होते म्हणून पहिल्या पर्यायाची चाचपणी केली. मी लगेचच चर्चेसाठी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची नावे सुचवली. उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई आणि दुसरा कोणीतरी चर्चा करेल, असे सांगितले. मात्र, त्यानंतर शिवसेनकडून कोणीच चर्चेसाठी आले नाही आणी त्यावेळी युती झाली नाही.

Uddhav Thackeray Raj Thackeray
MNS Shivsena UBT Alliance : ठाकरेंच्या एकीची विरोधकांना धास्ती, पण राज यांची उद्धव ठाकरेंना टाळी द्यायला टाळाटाळ

त्यानंतर 2017 सालच्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना व मनसेत चर्चा सुरु होती. मात्र, त्यावेळी दुसऱ्यांदा युती झाली नाही. पक्षासाठी किंवा स्वतःसाठी नाही तर मुंबईतील मराठी माणसासाठी, भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी युतीचा हात पुढे केला होता. पण आता युतीचा विषय संपला, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावेळी केली होती.

Uddhav Thackeray Raj Thackeray
BJP Politics : एकनाथ शिंदेंना भाजप मोठा धक्का देणार, नाशिकचा माजी खासदारच लावला गळाला

भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या हातात मुंबई गेली तर मराठी माणसाचे अस्तित्व मुंबईत राहणार नाही. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरेंना सात वेळा फोन केला, पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 2014 व 2017 मध्ये मनसे व शिवसेनेची युती न होण्यासाठी उद्धव ठाकरे हे कारणीभूत होते.

Uddhav Thackeray Raj Thackeray
Narendra Modi : 'नरेंद्र मोदींनी फोन केला अन् म्हणाले मराठीतून बोलू की...', उज्ज्वल निकमांनी सांगितला किस्सा

त्यानंतर आता महायुती सरकारने हिंदी सक्ती केली. त्यानंतर मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना हे विरोधी पक्ष एकवटले आहेत. हिंदी सक्तीच्या दोन्ही बंधूनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी दाखवल्यानंर महायुतीने दोन्ही जीआर रद्द केले. त्यानंतर हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या राज व उद्धव ठाकरे बंधूच्या विजयी मेळाव्याला वरळीत चांगला प्रतिसाद मिळाला.

Uddhav Thackeray Raj Thackeray
PM Narendra Modi यांच्यानंतर प्रंतप्रधान कोण? सर्व्हेत तीन नावं आली समोर, Amit Shah, Nitin Gadkari

त्याचवेळी सर्वसामान्य नागरिकातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने दोघे भाऊ लवकरच एकत्र येतील, असे वाटत होते. मात्र, आतापर्यंत उद्धव ठाकरे करीत असलेली चूक राज ठाकरे आता करीत आहेत. उद्धव ठाकरे युतीला तयार असले तरी बोलणीसाठी मनसे अजूनही 'नॉट इंट्रेस्टेड' आहे. त्यामुळे मनसे-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचे काय होणार ? याची उत्सुकता लागली आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray
Raj Thackeray Politics: ठाकरे बंधू एकत्र येणार का?, राज ठाकरे यांचे सुचक वक्तव्य, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com