Uddhav Thackeray| Election Commission  Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : मोठी बातमी ! निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला पहिल्यांदाच दिलासा; दिला 'हा' महत्वाचा निर्णय

Political News : शिवसेना दोन गटात विभागली गेली. यानंतर सर्वच गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेल्या. त्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला.

Sachin Waghmare

Mumbai News : दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात मोठी फूट पडली होती. या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. शिवसेना दोन गटात विभागली गेली. यानंतर सर्वच गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेल्या. त्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाला यापुढे निधी स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena ) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारता येणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे.

काही दिवसापूर्वीच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालादेखील निधी स्वीकारण्यास मंजुरी दिली होती. शरद पवारांनंतर आता उद्धव ठाकरेंनीदेखील निवडणूक आयोगात याबाबतची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

शिवसेनेतील पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर सर्वच गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने गेल्या. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले.

त्यानंतर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचं सर्वाधिक पाठबळ एकनाथ शिंदे यांनाच मिळाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगात ठाकरे गटाच्या पदरी सातत्याने निराशा मिळाली. पण आता पहिल्यांदाच गुरुवारी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT