asudin obesi Uddhav Thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray MM Equation : बिहारमध्ये MY समीकरण बिघडले, मुंबईत उद्धव ठाकरेंची मुस्लिम-मराठी रणनीती धोक्यात; ओवेसी, काँग्रेसने टेन्शन वाढवले

BMC Election MIM Congress : बिहारनंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणनीती निश्चित केली आहे. त्यात काँग्रेस आणि ओवेसींच्या पक्षाने ठाकरेंचे MM समीकरण धोक्यात आणले आहे.

Roshan More

Uddhav Thacke News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. भाजपच्या विजयाने महायुतीमधील मित्रपक्ष शांत झाले आहेत. तर, महाविकास आघाडीतील पक्षांना ही निवडणूक अवघड वाटू लागली आहे. तेजस्वी यादव यांच्या मुस्लीम-यादव समीकरण फेल करत भाजपने विजय मिळवला. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेला मुंबईत ठाकरेंना जे 'मराठी-मुस्लीम' या MM समीकरणामुळे जे यश मिळाले ते देखील धोक्यात आले आहे.

असुद्दीने ओवीसी यांच्या एमआयएम पक्षाने बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या आहेत. मुस्लिम मतदार हे एमआयएमला पाठींबा देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तेजस्वी यादव यांना फटका बसल्याचे बोलले जात आहे. त्याच प्रकारे एमआयएम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतर असल्याने मुस्लिम मतदार जर त्या पक्षाकडे गेले तर ठाकरेंचे MM समीकरण बिघडू शकते.

मुंबई महापालिकेत यापूर्वी मुस्लिम मतदार हा काँग्रेस आणि समाजवादी पक्षासोबत राहिल्याचे चित्र होते. काँग्रेसने स्वबळाचा नारा देत उद्धव ठाकरेंसोबत आघाडीला नकार दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत असताना ठाकरेंकडे मतांचा मुस्लिम टक्का जात होता त्यामध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.

भाजपचे उत्तर भारतीय समीकरण

हिंदी पट्ट्यात एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेसाठी हिंदी-गुजराती मतांवर विजयाचे समीकरण निश्चित केल्याची चर्चा आहे. उत्तर भारतीय सेनेचा प्रमुख सुनील शुक्ला म्हटला होता की, मुंबईत दोन कोटी 10 लाख मतदार आहेत. त्यातील एक कोटी मराठी आणि एक कोटी उत्तर भारतीय आहेत. जर उत्तर भारतीयांचे तीन टक्के मतदान जरी ठाकरेंच्या विरोधात गेले तरी उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो. कारण मराठी मतं ही पाच पक्षांमध्ये विभागली गेली आहेत. याच रणनितीप्रमाणे भाजप देखील उत्तर भारतीय मतं मिळवत विजयाचा मार्ग सुकर करण्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT