Local Body Election : "नोकरी सोडा, नाहीतर... धंदा बंद करा"; निनावी फोनच्या धमक्यांनी उमेदवार हादरला; अज्ञातस्थळी भूमिगत!

Political News : पक्षीय वाटाघाटींमध्ये उमेदवारीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर अनेकांना पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर शांत वाटणाऱ्या निवडणुकीत अचानक तणाव निर्माण झाला आहे.
 Local Body Election 2025 News
Local Body Election 2025 NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : पन्हाळा येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वपक्षीय एकमताने बिनविरोध निवडणूक करण्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीच्या चार दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. त्यानंतर पक्षीय वाटाघाटींमध्ये उमेदवारीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर अनेकांना पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर शांत वाटणाऱ्या निवडणुकीत अचानक तणाव निर्माण झाला आहे.

अपक्ष उमेदवार दबाव, धमक्या आणि दहशतीच्या छायेखाली असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य नागरिकालाही लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा आणि शोषित-वंचितांना न्याय मिळवून देण्याचा मार्ग संविधानात ठेवला आहे; मात्र पन्हाळ्यातील घडामोडींकडे पाहता, हीच लोकशाही धोक्यात येत असल्याचा सूर नागरिक आणि अपक्ष उमेदवारांमध्ये उमटताना दिसत आहे.

 Local Body Election 2025 News
BJP President : भाजप अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा; बिहार निवडणुकीची डेडलाईन संपली, 'ही' नावे चर्चेत

स्थानिक राजकीय आघाड्यांनी आपल्या सोयीप्रमाणे उमेदवार ठरविल्यानंतर अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून 'साम, दाम, दंड, भेद' यासारख्या नीतींचा वापर केल्याच्या चर्चा होत आहेत. त्यातून अपक्ष उमेदवारांना निनावी फोनवरून नोकरी सोडावी लागेल, धंदा बंद करावा लागेल, असा दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जात आहे, तर या सर्व दहशतीला कंटाळून एका अपक्ष उमेदवाराच्या पतीने नोकरीच सोडून देण्याची तयारी दर्शवली आहे.

 Local Body Election 2025 News
Shivsena Vs BJP : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या नेत्याकडून मारहाण, ऐन निवडणुकीपूर्वी ठाण्यातलं वातावरण तापलं

काहींच्या पर्यटनाशी संबंधित व्यवसायांवरही राजकीय दबाव आल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घटनांमुळे काही अपक्ष उमेदवार पन्हाळा सोडून सुरक्षित ठिकाणी गेल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलिस प्रशासनावरही दबाव टाकून परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

 Local Body Election 2025 News
NCP Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या गोटातून मोठे संकेत! महापालिका निवडणुकीसाठी नवा 'गेम चेंजर प्लॅन'?

अर्ज माघारीची अंतिम मुदत आज दुपारपर्यंत आहे. तोपर्यंत अपक्ष उमेदवारांना अजून काय सहन करावे लागणार आणि या प्रकरणात निवडणूक विभाग व पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 Local Body Election 2025 News
Latur Congress News : काका दिलीपराव देशमुखांनी हिरवा कंदील दिलेला नगराध्यक्षपदाचा उमेदवार पुतणे अमित देशमुख यांनी बदलला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com