Uddhav Thackeray addressing party workers during Shiv Sena’s ‘Nirdhar Melava’ in Mumbai, announcing youth-centric strategy for upcoming BMC elections. Sarkarama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: अमित शाहंना पुन्हा अ‍ॅनाकोंडाची उपमा; शोलेतील डायलॉग सांगत उद्धव ठाकरेंचा जनतेला इशारा

Uddhav Thackeray warns people News : अ‍ॅनाकोंडाला आता कोंडवावेच लागणार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे नाव न घेता केली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबईत विरोधकांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चात मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. यावेळी टीका करताना त्यांनी अ‍ॅनाकोंडाला आता कोंडवावेच लागणार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे नाव न घेता केली.

माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रानंतर राज्यातील राजकीय पक्षांची एकजूट पहिल्यांदा झाली असेल. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही. तर लोकशाहीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची एकजूट आहे. मतचोरी करणाऱ्यांना सांगतो आज ठिणगी बघत आहात. या ठिणगीची आग कधी होईल सांगता येत नाही. तुमच्या बुडाला आग लागेल. शोलेत एक डायलॉग आहे. दूर गाव में बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आयेगा. तसं सांगतो, सावध राहा. नाही तर अ‍ॅनाकोंडा येईल” असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी दिला.

“राजने डोंगरच उभा केला. तरीही निवडणूक आयोग ऐकत नाही. निवडणूक आयोग यांचा नोकर आहे. मी अॅनाकोंडा का म्हणतोय. यांची भूक थांबत नाही. आपला पक्ष, निशाणी चोरली. वडील चोरत आहेत. ते पुरत नाही म्हणून मतदान चोरी करत आहेत. सर्व आले. पण सत्ताधारी आले नाही” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

निवडणूक आयोगाच्या कार्यालयात कोणत्या पक्षाची माणसे काम करीत आहेत. लोकशाहीचा खून होताना बघत बसणार नाही. आता मतचोरीचा प्रयत्न करणाऱ्याला लोकशाही मार्गाने फटकावे. निवडणूक जवळ येत असल्याने दडपशाही सुरु झाली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

कायदेशीर पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. राज्यात मत चोर दिसेल तिथल्या तिथे लोकशाहीचा मार्गाने फटकावला पाहिजे. निवडणूक येईल तशी यांची दडपशाही सुरू होईल, त्यामुळे सावध राहण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT