Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

'आज' माझा नाही पण 'उद्या' माझा आहे : उद्धव ठाकरेंचा ऑपरेशन टायगरवर न खचता 'करारा जवाब'

Matoshree meeting News : मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष हजर होते तर 5 खासदार ऑनलाइन सहभागी झाले होते. या बैठकीनंतर मुंबईतील एका खासदाराकडे उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

Sachin Waghmare

Shivsena News : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या 8 दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. एनडीए बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच दिल्लीला गेले होते. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही खासदारांनी त्यांची भेट घेतली असल्याची चर्चा रंगली होती. तेव्हापासूनच 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू झाली आहे.

दक्षता म्हणून ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष हजर होते तर 5 खासदार ऑनलाइन सहभागी झाले होते. या बैठकीनंतर मुंबईतील एका खासदाराकडे उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेनेत (Shivsena) चार वर्षापूर्वी मोठी फूट पडली त्यावेळी 40 आमदार फुटले. त्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. सर्वांना कळते समजते ते मला माहित नव्हते का? मला त्याची कुणकुण होती. पण मी कोणालाच याबाबत बोललो नाही अथवा कसलाच दबाव टाकला नाही. त्यांच्या घोटाळ्याच्या फाइल तयार केल्या नाहीत. ज्यांना जायचे आहे त्यांन जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ आहे.

आताही ज्याला जायचं आहे त्याने खुशाल जावे. त्याचे भले व्हावे असेच मी म्हणेन. 'आज' माझा नाही पण 'उद्या' माझा नक्की आहे. तोपर्यंत सोसावे लागेल, सहन करावे लागेल. त्यावेळी हे जे बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेले आहेत, त्यांना पश्चाताप होईल पण त्यावेळी वेळ गेलेली असेल, अशीही उद्दिगनता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली असल्याची माहिती मुंबईतील एका खासदाराने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, मातोश्रीवर रविवारी दुपारी खासदारांची बैठक पार पडली. त्यानंतर रविवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन चर्चा केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची राज्य सरकारची घोषणा फसवी आहे. त्यामुळे या कर्जमाफीच्या विरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यावेळी मंगळवारी काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चाबाबत सूचना केल्या.

दरम्यान, मातोश्रीवर रविवारी दुपारी खासदारांची बैठक पार पडली. त्यानंतर रविवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन चर्चा केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची राज्य सरकारची घोषणा फसवी आहे. त्यामुळे या कर्जमाफीच्या विरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यावेळी त्यांनी मंगळवारी काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चाबाबत सूचना केल्या. कर्जमाफीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात 16 जूनला ट्रॅक्टर मोर्चा काढून राज्य सरकारला धारेवर धरण्याच्या त्यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी व तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्याबाबत रणनीती ठरविण्यात आली आहे. त्यामुळे आता या मंगळवारी होत असलेल्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT