Operation Tiger : उद्धव ठाकरेंची खासदारांसोबतची हायव्होल्टेज बैठक संपली! उपस्थित असलेल्यांची यादीच आली समोर; 'त्या' पाच जणांशी फोनद्वारे चर्चा

Political News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना मार्गदर्शन केले. बैठक संपल्यानंतर सर्व नऊ खासदारांशी उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबविले जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला असल्याने या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक मातोश्री निवासस्थानी बोलवली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 9 पैकी चार खासदार उपस्थित होते. तर अन्य पाच खासदार या बैठकीस ऑनलाइन उपस्थित होते. रविवारी दुपारी ही बैठक पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना मार्गदर्शन केले. बैठक संपल्यानंतर सर्व नऊ खासदारांशी उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

दिल्लीत एनडीएच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) बुधवारी गेले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेच्या काही खासदारांनी त्यांनी दिल्लीत भेट घेतली असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या चर्चेची दाखल घेत तातडीने खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला किती खासदार हजर राहणार याबाबत मोठी उत्सुकता होती, अखेर या बैठकीला हजर असलेल्या खासदारांची यादी समोर आली आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra News Live Update : कोयना धरणात अवघा 9 टीएमसी पाणीसाठा

त्यासोबतच पुढच्या महिन्यात पुन्हा मातोश्रीवर या सर्व खासदारांची बैठक होणार असून बैठकीस हजर नसलेले खासदार येत्या चार दिवसात मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. या बैठकीला 9 पैकी 9 खासदार उपस्थित होते, सर्व खासदार आमच्यासोबतच आहेत अशी माहिती या बैठकीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics Live Update : विजय पाटकर यांच्यावर मेघराज भोसले यांचा पलटवार; 'माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा...'

या बैठकीला मातोश्रीवर प्रत्यक्षरित्या चार खासदार उपस्थित होते तर पाच खासदार अप्रत्यक्ष (ऑनलाइन) बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी दिली. यामध्ये प्रत्यक्षरित्या मातोश्रीवर बैठकीस खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील हे खासदार बैठकीस उपस्थित होते.

Uddhav Thackeray
Shivsena Politics : 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू होताच ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; पण 'या' खासदाराने टाकला मिठाचा खडा? धक्कादायक माहिती समोर...

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे विधानपरिषद निवडणुकीमुळे तर वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या मुलाचा विवाह सोहळा असल्याने या बैठकीस ऑनलाइन हजर होते. त्याशिवाय परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मतदारसंघात अधिकमासामुळे धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्याने गैरहजर राहणार असल्याचे कळवले आहे. तर दुसरीकडे धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर त्यांचा मुलगा आजारी असल्याने या बैठकीस गैरहजर राहणार असल्याबाबत कळवले होते.

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे देखील कुटूंबासोबत सहलीवर गेले असल्याने बैठकीला गैरहजर राहणार असल्याचे कळवले होते. गैरहजर असलेले हे पाच खासदार बैठकीस ऑनलाइन उपस्थित होते. या पाच खासदारांशी उद्धव ठाकरे यांचे बोलणे जाहले असून येत्या चार दिवसात हे खासदार मातोश्रीवर येऊन भेटून जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
Mamata Banerjee: दिल्लीत मोठ्या घडामोडी! ममतांची 'इंडिया'च्या बैठकीला उपस्थिती अन् तृणमूलचे २० खासदार नॉटरिचेबल; सुवेंदू अधिकारीही पोहोचले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com