Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena NCP symbol issue: उद्धव ठाकरे-शरद पवारांना सुप्रीम कोर्टाचा धक्का : स्थानिक निवडणुकीत धनुष्यबाण अन् घड्याळ वापरण्याचे इरादे धुळीस

Political News : सुप्रीम कोर्टात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकांवर युक्तिवाद होणार आहे. या दिवशी युक्तिवाद करण्यासाठी दोन्ही पक्षांना दोन-दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

New Delhi News : शिवसेना पक्ष व चिन्ह प्रकारणांची सुनावणी बुधवारी दुपारी सुप्रीम कोर्टात पार पडली. यावेळी या प्रकरणी पुढील सुनावणी 21 जानेवारीला सकाळी 11.30 वाजता होणार आहे. यावेळी सुप्रीम कोर्टात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकांवर युक्तिवाद होणार आहे. या दिवशी युक्तिवाद करण्यासाठी दोन्ही पक्षांना दोन-दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टात या प्रकरणी बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूचे म्हणने ऐकून घेतले. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर या प्रकरणी 21 जानेवारीला सकाळी 11.30 वाजता होणार आहे. यावेळी सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत युक्तिवाद होईल तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष (NCP) चिन्हाबाबत युक्तिवाद होणार आहे.

शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर गेल्या तीन वर्षांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सर्व राज्याचे लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागले आहे. मात्र नेहमीच या प्रकरणाला नवीन तारीख मिळत असते. बुधवारी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागले होते. पक्ष आणि चिन्हाचा निर्णय होणे अपेक्षित असताना कोर्टाने आता 21 जानेवारी नवीन तारीख दिली आहे. त्यामुळे आज देखील या खटल्याचा निकाल लागला नसून पुन्हा एकदा नवीन तारीख दिली आहे. 26 नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यामुळे आजच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट निराश झाला आहे.

राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत आहेत. या निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष व चिन्ह यावर १२ नोव्हेंबरला सुनावणी होऊन निर्णय लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धनुष्यबाण अन् घड्याळ वापरण्याचे त्यांचे इरादे धुळीस मिळाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT