Shivsena UBT News: मंगळवारचा दिवस नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची राजकीय पीछेहाट करणारा ठरला. एकाच वेळी चार नगरपालिकांमध्ये भाजपने ठाकरेंना धक्का दिला. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना हे घडले आहे.
भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला आपली ताकद दाखविली आहे. तीस वर्ष इगतपुरी नगरपालिकेत संजय इंदुलकर यांची एक हाती सत्ता होती. उद्धव ठाकरे यांच्या या शिलेदाराने ठेवलेल्या मुंबईत भाजप प्रवेश केला.
याबरोबरच पिंपळगाव बसवंत येथे भास्करराव बनकर यांनी दुसरा धक्का दिला. भास्करराव बनकर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला पिंपळगाव बसवंत नगरपालिकेत उमेदवार मिळविणे कठीण झाले.
सिन्नर नगरपालिकेत मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भरत कोकाटे गेल्या आठवड्यात भाजप पक्षात गेले होते. आता खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलते व माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे हे भाजपच्या वाटेवर आहेत. सिन्नर मध्ये मंत्री कोकाटे आणि खासदार वाजे यांच्या घरात भाजपने भूकंप घडविला आहे.
ओझर नगरपालिका निवडणूक भाजपने स्वबळावर लढविण्याची घोषणा केली आहे. जिल्हा अध्यक्ष यतीन कदम यांनी काल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे दोन माजी नगरसेवक आणि एक माजी पंचायत समिती सदस्य फोडले. त्यामुळे मंगळवारचा दिवस शिवसेना ठाकरे पक्षाला धक्के देणारा ठरला.
इगतपुरीचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इगतपुरी नगरपालिकेत भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार होती. त्यांचे हे प्रयत्न आता अधिक दमदार झाले आहेत.
भारतीय जनता पक्ष नगरपालिका निवडणुकीत कोणाशी युती करणार यावर खलबते सुरू होती. यापूर्वीच महायुतीत फूट पडली आहे. काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाबरोबर युती करीत आहे. या सर्व घडामोडी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला मात्र साईड ट्रॅक करण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षानेही विविध ठिकाणी आपल्याजवळ लावत राजकीय अस्तित्व दाखवून दिले आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.