Waqf Board Amendment Bill uddhav Thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Waqf Board Amendment Bill Latest Update : लोकसभेत शेवटच्या क्षणी पत्ते ओपन! उद्धव ठाकरेंच्या खासदारांचे वक्फ विधेकाच्या विरोधात मतदान

Waqf Board Amendment Bill Latest Update Shivsena UBT :विधेयकावरील चर्चे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारच्या हेतुवर आक्षेप घेतला.

Roshan More

Shivsena UBT : वक्फ सुधारणा विधेयकावर बुधवारी (ता.2) लोकसभेत मतदान झाले. लोकसभेत दुपारी 12 वाजता सुरू झालेली या विधेयकावरील चर्चा मध्यरात्री पर्यंत सुरू होती. मध्यरात्री 2 वाजता हे विधेयक मंजुर करण्यात आले. लोकसभेत झालेल्या मतदानानुसार विधेयकाच्या बाजुने 288 तर विरोधात 232 मतदान होत हे विधेयक मंजुर करण्यात आले.

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत शेवटच्या क्षणी भूमिका जाहीर करू, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.लोकसभेत झालेल्या मतदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांनी इंडिया आघाडीला साथ देत या विधेयकाच्या विरोधात मतदान केले.

विधेयकावरील चर्चे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारच्या हेतुवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, सरकारने ज्या प्रकारे हे विधेयक आणले आहे ते पाहात यांचा हेतु स्पष्ट दिसत नाही. मी संयुक्त संसदीय समितीमध्ये (जेपीसी)मध्ये होतो. दुर्देवाने या समितीमध्ये विधायकावरील तरतुदींवर, त्यातील कलमांवर सविस्तर चर्चाच झाली नाही.

आज राज्यसभेत फैसला

लोकसभेत मंजुर झालेले विधेयक आज (गुरुवारी) राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे. राज्यसभेतील मंजुरीनंतर ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल. दरम्यान, राज्यसभेत भाजपकडे सर्वाधिक 98 सदस्य आहेत. तर, एनडीएकडे 115 सदस्य आहेत. आणि तसेच सहा राष्ट्रपती नियुक्त सदस्य देखील आहेत. विधेयक राज्यसभेत पास होण्यासाठी 119 सदस्यांची आवश्यकता आहे. विरोधी पक्षांमध्ये 85 सदस्य आहेत.

फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर

विधेयकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारासाठी वक्फ विधेयकाच्या बाजुने मतदान करण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केले होते. त्यावर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले, देवेंद्र जी, वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही. ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा ,त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता ! तुमच्यात हा दम आहे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT