Uddhav Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Opposition Leader : भाजपच्या खेळीचा फुगा ठाकरेंनी फोडला, फडणवीसांसह राहुल नार्वेकरांच्या रणनीतीला ढकलपंची म्हणत काढले सरकारचे वाभाडे

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis And Speaker Rahul Narwekar : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदावरून तीव्र राजकीय वाद सुरू झाले असून वर्षभराहून अधिक काळ झाला तरी विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

Aslam Shanedivan

  1. उद्धव ठाकरे यांनी विधानभवनातील पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांचे प्रश्न, जाहीर पॅकेज आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

  2. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विरोधी पक्षनेते पदासाठी सुरू असलेल्या चालढकलवर नाराजी व्यक्त केली.

  3. भाजपने खेळलेल्या राजकीय खेळीचा ‘फुगा फोडल्याचा’ दावा करत ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

Nagpur News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवारी) अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विधानभवनात पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचे प्रश्न, जाहीर केलेले पॅकेजसह विरोधी पक्षनेते पदावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी, सरकार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून विरोधी पक्षनेते पदासाठी होणाऱ्या चालढकलवरून देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी भाजपने खेळलेल्या खेळीचा फुगाही फोडला आहे.

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेदी नियुक्ती व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीने केली होती. मात्र मविआच्या मागणीला छेद देत भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा सुरू झाली होती. भास्कर जाधवांना शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध केल्याने भाजपने विरोधीपक्ष नेतेपदावरुन गुगली टाकली होती. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेदी अनिल परब यांना पसंती देत भाजपने मविआमध्ये फूट पडण्याची रणनीती आणखी होती.

मात्र आज थेट अधिवेशनाला हजेरी लावत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा फुगा फोडला. त्यांनी भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी कायम असल्याचे सांगत सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. तसेच विरोधी पक्ष नेते पदाबाबत तुमच्या मनात जो प्रश्न आहे तोच जनतेच्या मनात देखील आहे. या अधिवेशाच्या आधीच याबाबत आमची चर्चा झालीय.

याआधी देखील पहिल्या अधिवेशनातच आम्ही विरोधी पक्ष नेते पदावरती दावा सांगितल्याचे सांगत भास्कर जाधव यांचे दिल्याचे सांगितले. मात्र अजून त्यावर सरकार असो किंवा अध्यक्षांकडून उत्तर मिळालेलं नाहीये. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री पदाबाबत सांगितले आहे. जर उपमुख्यमंत्री पदाबाबत खरच नियम असेल किंवा नसेल. तो कागदावरती असला काय आणि नसला काय जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद असल्याचा पुन्हा एकदा उच्चार त्यांनी केला आहे.

ठाकरे यांनी, हे एक नव्हे तर दोन दोन उपमुख्यमंत्री पदे जे हे सरकार निर्माण करू शकतं. ते विरोधी पक्षनेतेपद द्यायला का घाबरत आहे, असाही सवाल त्यांनी केला आहे. तसेच महायुतीचे एवढे मजबूत सरकार की दोन दोन उपमुख्यमंत्री पदे जे संविधानिक नसलेली पद आहे, ती निर्माण करू शकत. पण हेच सरकार विरोधी पक्षनेतेपद द्यायला का घाबरतं आहे. कोणाला घाबरत आहे? 200 च्या वरती जागा निवडून आलेले असताना केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद असतानाही विरोधी पक्ष नेते पद देण्यासाठी का घाबरत आहात असा सवाल केला आहे.

या दरम्यान ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या स्पष्टीकरणावर देखील जोरदार प्रहार केला आहे. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा अध्यक्षांच्या अखत्यारीतला असून तेच निर्णय घेतील असे त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे सरकार आणि विधानसभा अध्यक्ष एकमेकांकडे हा विषय ढकलण्याचे काम करत अशल्याची चर्चा रंगली होती. यावरून जर खरच हा विषय अध्यक्षांकडे असेल तर राज्याचे मुख्यमंत्री हे कणखर आहेत. तर त्यांनी याबाबत त्यांना का विचारले नाही, असा सवाल केला आहे. तसेच या बाबत आपल्याला अध्यक्षांना भेटण्याची गरज नसून ही लोकशाहीची मांडणी आहे. मात्र आता मुख्यमंत्री आणि अध्यक्षांनी याबाबत सांगड घातली आहे. अध्यक्षांबाबत आम्ही आमची मतं याआधीच स्पष्ट केली असून ही ढकलपंची सुरू आहे. पण आम्ही याबाबच आमचे पत्र दिले असल्याचेही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

FAQs :

1. उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात कोणते मुद्दे मांडले?
शेतकरी प्रश्न, पॅकेज, विरोधी पक्षनेते पदावरील चालढकल आणि भाजपची राजकीय खेळी याबाबत त्यांनी स्पष्ट टीका केली.

2. त्यांनी राहुल नार्वेकरांवर टीका का केली?
विरोधी पक्षनेते पदावर निर्णय न देण्याची चालढकल सुरू असल्याचे ते म्हणाले.

3. पॅकेजबाबत ठाकरे यांचे मत काय होते?
सरकारचे पॅकेज अपुरे आणि दिखाऊ असल्याची टीका त्यांनी केली.

4. भाजपच्या खेळीचा ‘फुगा फोडला’ म्हणजे काय?
भाजप आतून राजकीय खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्याचा उलगडा केल्याचे म्हटले.

5. या वक्तव्यामुळे काय परिणाम दिसू शकतात?
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापू शकते व महायुती–विरोधक वाद तीव्र होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT