Uddhav Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

tractor march: खासदारांसोबतची बैठक संपताच उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; 'या' मुद्द्यावरून थेट सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार!

tractor march Maharashtra News : उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्याविरोधात आक्रमक होत राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी मंडळीला धारेवर धरण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यात गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याची चर्चा रंगल्याने वातावरण चांगलेच तापले होते. या पार्श्वभूमीवर दगाफटका टाळण्यासाठी मातोश्री निवास्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलवली होती. या बैठकीवेळी त्यांनी उपस्थित खासदारांना मार्गदर्शन केले त्यासोबतच कानमंत्र देखील दिला. त्यासोबतच यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्याविरोधात आक्रमक होत राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी मंडळीला धारेवर धरण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्यातील महायुती सरकारने केली आहे. मात्र, ही कर्जमाफीची घोषणेच्या माध्यमातून राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. त्यामुळे या कर्जमाफीच्या विरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) वतीने 16 जूनला जिल्हयात ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील या आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयावर 16 जूनला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. त्यासोबतच या मोर्चाबदल आठही जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखासोबत रविवारी रात्री ऑनलाईन बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी यावेळी बैठकीस ऑनलाइन उपस्थित असलेल्या मराठवाडयातील खासदारांना ही यावेळी मोर्चाबाबत मार्गदर्शन केले. येत्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत राज्य सरकारची कोंडी करण्याचे आदेश दिले आहेत. कर्जमाफीच्या माध्यमातून राज्य सरकार फसवणूक करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जमाफीच्या विरोधात आवाज उठवा, अशा सूचना यावेळी ठाकरे यांनी दिल्या आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात 16 जूनला ट्रॅक्टर मोर्चा काढून राज्य सरकारला धारेवर धरण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी व तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्याबाबत रणनीती ठरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT