Shivsena Politics : 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू होताच ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; पण 'या' खासदाराने टाकला मिठाचा खडा? धक्कादायक माहिती समोर...

Uddhav Thackeray Meeting : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा जोर धरत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde during his Delhi visit discussing political strategies, highlighting rising tension in Maharashtra politics.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : देशासह राज्यातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला असून बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होताना दिसत आहे. पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीनंतर देशभरात विविध स्तरांवर पक्षांतर आणि नव्या राजकीय आघाड्यांबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातही मोठ्या हालचाली घडत असल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील आपले राजकीय स्थान अधिक मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातूनच शिंदे यांच्या कथित 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा जोर धरत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

या बैठकीसाठी दिल्लीसह विविध ठिकाणी असलेल्या खासदारांना तातडीने मुंबईत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळपासून त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Nashik Food Safety : धक्कादायक! प्रतिष्ठितच करतात दुधात भेसळ, नागरिकांच्या जीवाशी खेळ; दुधाचे 16 तर दुग्धजन्य पदार्थांचे 38 नमुने सदोष...

दरम्यान, वाकचौरे हे गेल्या दोन दिवसांपासून कुटुंबासमवेत बाहेरगावी असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निवासस्थानीही सध्या कोणी नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांचे स्वीय सहाय्यकही त्यांच्यासोबत नसल्याने ते नेमके कुठे आहेत आणि त्यांच्याशी संपर्क का होत नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Nashik: कुंभमेळ्याच्या विकासकामांवरून नाशिकमध्ये संताप; भाजप नगरसेवकही आक्रमक

त्यामुळे आज मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीला वाकचौरे उपस्थित राहणार की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटातील काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनाही राजकीय वर्तुळात जोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला पक्षातील कोणते खासदार हजेरी लावणार आणि ठाकरे यांना कोणता कानमंत्र देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com