Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : तुमच्या नाकावर टिच्चून सत्ता आणून दाखवतो; उद्धव ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना चॅलेंज

Uddhav Thackeray Party Meet : मुंबईत ठाकरे गटाच्या मेळाव्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली.

Sachin Waghmare

Mumbai Shiv Sena Party Melava : विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. राज्यातील सत्ताधारी मंडळींच्या नाकावर टिच्चून सत्ता आणून दाखवतो. हीच शपथ सर्व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे.

नेता प्रवाह अडवून दाखवतो आणि उलटा फिरवून दाखवतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मी ते केले आहे. त्यामुळे येत्या काळात हे आव्हान स्वीकारून सर्वांनी कामाला लागावे असे चॅलेंज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.

मुंबईत ठाकरे गटाच्या (Shivsena Melava) मेळाव्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली. शंकराचार्य म्हणतात विश्वास घात करणार हिंदू असू शकत नाही.

आपल्या भगव्यावर मशाल लावू नका. कारण तो भगवा आहे. ज्या भगव्यावर धनुष्यबाण आहे. त्याठिकाणी मशाल दिसली पाहिजे. लवकरच त्याबाबतचा निकाल लागणार आहे. आमची सुप्रीम कोर्टावर श्रध्दा आहे. मला माझा शिवसेना नाव पाहिजे जे मला मिळणार हा विश्वास यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) व्यक्त केला.

तो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा लागेल. जे आपले मतदार आहेत त्यांनी चुकून धनुष्यबाणला मत केले आहे. आम्ही चिन्हाप्रमाने दुसरे चिन्ह देऊ नका, असे म्हणालो आहे. पाहू त्याचा निकाल कधी लागतो, असेही यावेळी ठाकरे म्हणाले.

मुस्लिम समाजाच्या गर्दीत मी म्हटले की, माझे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? त्यांनी होकार दिला. आपले हिंदुत्व वेगळे आहे. त्यासोबतच पक्षातून जायचे आहे त्यांनी आताच खुशाल जावे, मी कोणालाच रोखणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी माणसाला नोकरी नाही म्हणून सांगणाऱ्यांचे कान फोडा. हवे तर पाहिले गेट आउट म्हणा. काही जणांना शिवसेना तोडायची आहे. आपल्या खुर्चीसाठी आईच्या कुशीवर हे वार करत आहेत.

बाळासाहेब यांचे नाव घेण्याची यांची लायकी नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली. राज्यात आपले सरकार आल्यानंतर धारावी टेंडर रद्द करणार आहे. मुंबईत विकास कामे नाही भकास कामे होत आहेत. वेड्यावाकड्या ठिकाणी मेट्रो उभारतात अशी टीकाही त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT