Rahul Narwekar and Uddhav Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; ...त्यामुळेच नार्वेकरांनी आमच्या विरोधात दिला निकाल

Political News :नार्वेकर यांनी त्यांच्या निकालात शिवसेना पक्ष व चिन्ह त्यासोबतच खरी शिवसेना शिंदे गटाची असल्याचे सांगत आमदार अपात्र ठरवले नव्हते. हा निकाल उद्धव ठाकरे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

Sachin Waghmare

Dharshiv News : शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर दिलेला निकाल हा ठाकरे गटाच्या विरोधात दिला. नार्वेकर यांनी त्यांच्या निकालात शिवसेना पक्ष व चिन्ह त्यासोबतच खरी शिवसेना शिंदे गटाची असल्याचे सांगत आमदार अपात्र ठरवले नव्हते. हा निकाल उद्धव ठाकरे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी जनता न्यायालय व महापत्रकार परिषद घेत नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर टीका केली होती. त्यामुळे ठाकरे गट राहुल नार्वेकर यांची कोंडी करण्याची संधी सोडत नाही.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर दिलेला निकाल हा ठाकरे गटाच्या विरोधात आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली जाते. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारीसुद्धा राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील सभेप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल नार्वेकर लबाड असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. (Uddhav Thackeray News)

राहुल नार्वेकर आता भाजपकडून लोकसभा निवडणूक लढत आहेत. मी त्यांच्यावर आरोपच करतोय. तुम्हाला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे लालच भाजपने दाखवले होते. त्यामुळेच तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात निकाल दिला असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी भरसभेत केला.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी राहुल नार्वेकरांनी आमच्याविरोधात निकाल दिला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी या वेळी उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. राहुल नार्वेकर आता भाजपकडून लोकसभा निवडणूक लढत आहेत. मी आज आरोपच करतोय. तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालच दाखवून तुम्हाला माझ्या शिवसेनेच्या (shivsena) विरोधात निकाल द्यायला भाग पाडले, हा माझा आरोप आहे.

'सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणीवेळी स्पष्ट्पणे म्हटले आहे, तुम्ही म्हणजे त्या लवाद्याने जो निकाल दिलेला आहे, तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात वाटत नाही काय ? हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे', असा घणाघात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या वेळी सभेत बोलताना केला. त्यामुळे ठाकरे यांनी केलेल्या आरोपांची चर्चा सुरू झाली आहे.

R

SCROLL FOR NEXT