Shivsena News : शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देणाऱ्या परभणीत निष्ठावंत बंडू जाधवांसाठी उद्धव ठाकरे कधी सभा घेणार?

Loksabha Election 2024 : शिवसेनाप्रमुखांची एक सभा म्हणजे शिवसेनेचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याची हमी असायची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतरही प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान परभणीकरांना बाळासाहेबांच्या सभेची आठवण होते.
Uddhav Thackeray-Bandu Jadhav
Uddhav Thackeray-Bandu JadhavSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. परभणीचे विद्यमान खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. पण, त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परभणी दौऱ्याची शिवसैनिकांना उत्सुकता लागली आहे.

शिवसेना (Shivsena) आणि परभणी (Parbhani) यांचे एक ऐतिहासिक नाते आहे. निवडणुकीचा प्रचार म्हटले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेची जिल्ह्यातील मतदारांना कायम उत्सुकता असायची. शिवसेनाप्रमुखांची एक सभा म्हणजे शिवसेनेचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याची हमी असायची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) यांचे निधन झाल्यानंतरही प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान परभणीकरांना बाळासाहेबांच्या सभेची आठवण होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray-Bandu Jadhav
Madha Loksabha Constituency : माढ्याचा तिढा सुटणार...भाजपचा बडा नेता उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

शिवसेना हा चार अक्षरी शब्द आणि शिवसेनाप्रमुखांच्या ठाकरे शैलीतील भाषणाने परभणी जिल्ह्यातील जनतेला नेहमीच भारावून टाकलेले आहे. मातोश्रीहून आलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन या जिल्ह्यातील शिवसैनिकांनी प्राणपणाने केले आहे. बाळासाहेबांनी दिलेल्या प्रत्येक उमेदवाराला जिल्ह्यातील मतदारांनी नेहमीच निवडून दिले आहे.

धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिवसेनेला अधिकृत मिळाले नव्हते. दिवंगत नेते अशोक देशमुख यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि निवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह निवडले गेले. अशोक देशमुख हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते. तसेच, राज्यातील सहा मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह अधिकृतपणे बहाल केले. त्यामुळे शिवसेनेला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देणारा लोकसभा मतदारसंघ म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाची राज्यात ओळख आहे. तसेच, ज्या राजकीय नेत्यांनी शिवसेना सोडून अन्य पक्षात प्रवेश केला, त्यांचे राजकीय पुनर्वसन भविष्यात कधीच झालेले नाही.

Uddhav Thackeray-Bandu Jadhav
Maharashtra BJP : भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापणार; कोण टिकणार, कोण उडणार?

शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ दिली. खासदार संजय जाधव हे निवडणुकीसाठी सज्ज असून, तिसऱ्या वेळेस मैदानात उतरत आहेत. मात्र, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 ची लोकसभा निवडणूक वेगळी असणार आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह बहाल केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मशाल या चिन्हाचा स्वीकार केला. त्यामुळे सर्वांत महत्त्वाचा बदल पक्षचिन्हाबाबत असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक प्रचारात निष्ठावंत विरुद्ध गद्दार याच मुद्द्यावर केंद्रित केल्याने परभणी जिल्ह्यात त्याचा फायदा पक्षाला मिळू शकतो.

Edited By : Vijay Dudhale

R

Uddhav Thackeray-Bandu Jadhav
Paricharak-Kale News : खासदार निंबाळकरांच्या अडचणी वाढल्या; प्रशांत परिचारक-काळेंनीही फिरवली पाठ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com