devendra fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena News : उद्धव ठाकरेंचे 4 बडे नेते सीएम फडणवीसांच्या भेटीला; नेमकी काय झाली चर्चा? राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला

Shiv Sena UBT News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील राजकारण गेल्या 15 दिवसापासून चांगलेच तापले आहे. त्यातच राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत असल्याने वेगवान घडामोडी घडत असल्याने चर्चेला उधाण आले आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे चर्चेला उधाण आले असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सीएम देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती दिली होती. त्यासोबतच आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबतही त्यांनी सविस्तर माहिती मांडली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्य शिवसेनेच्या मुंबईतील प्रमुख चार नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. यावेळी त्यांच्यात मुंबईत येत्या काळात राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यासोबतच यावेळी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या भेटीसाठी विधानभवनात दाखल झाल्या होत्या. यावेळी ठाकरे यांच्या सेनेचे आमदार अनिल परब, सुनील प्रभू आणि अजय चौधरी हे देखील उपस्थित होते. त्यांच्यात यावेळी सविस्तर चर्चा झाली असल्याचे समजते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीदरम्यान मुंबई शहरातील प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे पत्रही सादर केल्याचे सांगितले जात असून या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत असल्याने या भेटीला विशेष महत्त्व पर्याप्त झाले आहे.

विधानभवनात सीएम देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट ही मुंबई शहरातील प्रलंबित प्रश्न, विकास कामाबाबत असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात असले तरी यावेळी या नेतेमंडळीमध्ये या भेटीवेळी नेमकी काय चर्चा झाली? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT