Abdul Sattar News: मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर बंडाचं निशाण फडकवलेल्या शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा; म्हणाले...'

Mahayuti News: माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी 'भाजप शिवसेना पक्ष संपवू पाहात आहेत. त्यांनी आधी आमचे हात पाय तोडले,आता तर मुंडकंच उडवेल' या विधानानं महायुतीत खळबळ उडवून दिली होती. यानंतर सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
Abdul Sattar Devendra Fadnavis .jpg
Abdul Sattar Devendra Fadnavis .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराजीनाट्य उफाळून आल्याचं दिसून आलं होतं. यातच छत्रपती संभाजीनगर महायुतीतील कुरघोडी,नाराजीची झळ थेट मुंबईपर्यंत पोहोचली. यात 'भाजप शिवसेना पक्ष संपवू पाहात आहेत. त्यांनी आधी आमचे हात पाय तोडले,आता तर मुंडकंच उडवेल'या विधानानं महायुतीत खळबळ उडवून दिलेल्या माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

सिल्लोड मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी(ता.3 जून)मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी फडणवीसांसमोर आपल्या अडीअडचणी,व्यथा तसेच महायुतीतील नेत्यांमध्ये जे काही वादविवाद होते ते मांडल्याचं सत्तार यांनी सांगितलं.

अब्दुल सत्तार पुढे म्हणाले देवेंद्र फडणवीस हे आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. ते व आमचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही आपआपल्या पक्षांच्या नेत्यांना महायुती धर्म पाळण्या संदर्भात निर्देश देतील. पण आता आमच्या मनातील नाराजी दूर झाली असून उद्या मी माझ्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मी मुख्यमंत्र्यांकडून कोणतंही आश्वासन,शब्द घेतलेला नाही. मुख्यमंत्री महायुतीचे आहेत,मी महायुतीचा आमदार आहे याची तंतोतंत जाणीव त्यांना करुन दिली. आम्हांला खालच्या लेव्हलला जो काही त्रास होत होता तो यापुढे होणार नाही याची खात्री मुख्यमंत्री फडणवीसांनी आम्हांला दिली असंही शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

Abdul Sattar Devendra Fadnavis .jpg
Pune Crime News: पुण्याला हादरवणारं कांड; 2 वर्षांत तब्बल 500 गर्भपात; पोलिसांच्या तपासात डोकं सुन्न करणारी माहिती समोर

शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपवर केलेले गंभीर आरोप व दोन्ही शिवसेना एकत्र येण्याविषयीच्या विधानाचे तीव्र पडसाद महायुतीत उमटले. एवढंच नव्हे तर या त्यांनी केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केली.ज्यानंतर उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनीही अब्दुल सत्तार यांना तात्काळ मुंबईत बोलावून घेतले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सत्तारांमध्ये मंगळवारी(ता.2 जून) सुमारे साडेतीन तास बैठक झाली होती. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आम्ही सर्वांनी मिळून सत्ता आणली. पण सत्ता आल्यानंतर एकच पक्ष आपला पक्ष वळवून दुसरा पक्ष संपवत असेल तर याला कोणाला विचारण्याची गरज नाही.

Abdul Sattar Devendra Fadnavis .jpg
CJP news : प्रियांका चतुर्वेदींनी खंत बोलून दाखविली; कॉक्रोच जनता पार्टीने लगेचच घेतली दखल, अभिजीत दीपके सरसावले

सत्तार यांनी एकनाथ शिंदेंसमोर भाजपसह शिवसेनेच्याही काही नेत्यांविषयीचा तक्रारींचा पाढा वाचला. मी माझ्या नेत्याला ही सर्व माहिती तंतोतंत दिली. मी काही भारतीय जनता पार्टीच्या देशाच्या किंवा राज्याच्या नेत्यांबद्दल बोललो नाही. पण मी आमच्या जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्ह्यामध्ये आम्हांला जी वागणूक देऊ लागले, ती वागणूक विरोधीपक्षाहूनही वाईट असल्याचं सांगितलं.

अब्दुल सत्तार यांनी शिंदेंसोबतच्या प्रदीर्घ चर्चेनंतर बंडाची तलवार म्यान केली होती. शिंदेंनी कडक शब्दांत महायुतीचा धर्म पाळायचा आहे, माघार घ्या, असं सुनावलं. त्यानंतर सत्तार यांनी शिंदे यांच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे माध्यमांसमोर येत जाहीर केले होते. शिंदे यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत त्यांनी शिवसेनेतील काही नेत्यांच्याही तक्रारी केल्या.भाजपला रोखा अन्यथा पक्ष संपेल, असा धोक्याचा इशाराही दिला होता. पण त्यांनी आपण मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचंही म्हटलं होतं.त्याप्रमाणे ही भेट पार पडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com