Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra budget benefits : मुंबई-पुणे-नागपूरला 'बूस्टर डोस'! फडणवीसांनी दिली अर्थसंकल्पातील 'खास' माहिती; महाराष्ट्राच्या ग्रोथ हबसाठी हजारो कोटींची रसद!

Mumbai Pune Nagpur growth News : महाराष्ट्राच्या ग्रोथ हबसाठी हजारो कोटींची रसद मिळणार असून त्यासोबतच अर्थसंकल्पात राज्याला काय काय मिळाले, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : लोकसभेत रविवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने ५३.५ लाख कोटी रुपयांच्या एकूण खर्चाचा आराखडा मांडला. केंद्राच्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुंबई-पुणे-नागपूरला 'बूस्टर डोस' मिळणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथ हबसाठी हजारो कोटींची रसद मिळणार असून त्यासोबतच अर्थसंकल्पात राज्याला काय काय मिळाले, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे, अशी माहितीही अर्थसंकल्पावर बॊलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाला विकसित भारताकडे नेणारा दमदार अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. विकसीत भारताकडे नेहणारे हे बजेट आहे. औद्योगिक सवलतीमुळे फोठा फायदा होणार आहे. उद्योग गुंतवणुकीचा आपल्याला फायदा होणार आहे. रेल्वे कोरिडॉरमुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरातील प्रवास अधिक वेगवान होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT