Ramdas Athawale News : सर्वसामान्यांना स्पॅम काॅलचा त्रास सहन करावा लागतो. यातून फसवणूक करत पैसे देखील लुटले जातात. मात्र, स्पॅम काॅलचा त्रास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देखील सहन करावा लागला. या विषयी त्यांनीच पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
रामदास आठवले म्हणाले, मला एक फोन आला. धनसे त्यांचं नाव होतं. त्यांनी सांगितलं ते शिर्डीतील शिक्षक आहे. शाळेतील मुलांना घेऊन गोदींयाला सहलीसाठी आले आहेत. मात्र, गोदींयाच्या पाच किलोमीटर बाहेर त्यांच्या बसला अपघात झाला आहे. अजून कोणीच आलं नाही. ताबडतोब पैसे पाठवा. गुगल पेवर पाठवा.
रामदास आठवलेंनी सांगितले की, गुगल पेवर पैशाची मागणी केल्यानंतर मी त्यांना गुगलवर पैसे पाठवू शकत नाही. तुम्ही अकाऊंटनंबर द्या असे म्हटले. मात्र, नंतर आमच्या लक्ष्यात आलं की हे बोगस प्रकरण आहे.
रामदास आठवले म्हणाले, बिहारच्या दौऱ्यावर असताना हा काॅल आला होता. फोन करणाऱ्याने मुलं दवाखान्यात देण्यासाठी पैशाची मागणी केली. मी कार्यकर्त्यांना मदतीसाठी सांगितले तेव्हा हे बोगस प्रकरण असल्याचे समोर आले.
सायबर चोरट्यांच्या निशाण्यावर राजकीय नेत्यांसोबत प्रशासकीय अधिकारी देखील आहेत. अनेक अधिकाऱ्यांचे बनावट फेसबूक आयटी बनवून पैशाची मागणी करण्यात येते. तसेच जुने साहित्य विकण्याचा बहाणा करून देखील ऑनलाईन पैसे मागवून फसवणूक केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.