BJP Vs AAP : मोठी बातमी! विधानसभेनंतर भाजपचा केजरीवालांना पुन्हा दिल्लीत धक्का; 'आप'च्या 3 नगरसेवकांनी साथ सोडली

Delhi Mayor Election : मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात महापौरपदासाठीची निवडणूक पार पडली होती. दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाचा कालावधी हा अवघ्या पाच महिन्यांसाठीच होता. या निवडणुकीत आपने भाजपला धोबीपछाड देत विजय मिळवला होता.
BJP vs AAP .jpg
BJP vs AAP .jpgSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा धुव्वा उडवत भाजपनं जवळपास 27 वर्षांनी पुन्हा एकदा सत्ता खेचून आणली.70 पैकी तब्बल 48 जागा जिंकून भाजप सत्तेत परतलं. तर दुसरीकडे 22 जागा जिंकल्या असल्या तरी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) , मनीष सिसोदिया यांच्यासारख्या आपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर आपला आता दिल्ली महापालिकेत मोठा हादरा बसला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजप (BJP) अरविंद केजरीवालांच्या आपला दिल्ली महापालिकेत धक्का देण्याची तयारीत असल्याची चर्चा आहे. याच धर्तीवर भाजपकडून आता महापालिकेतील आपच्या नगरसेवकांवर गळ टाकण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यात भाजपला मोठं यश आलं आहे. तीन नगरसेवक भाजपच्या गोटात सामील झाले आहेत.

दिल्लीतील अँड्र्यूज गंजमधील नगरसेविका अनिता बसोया, आरकेपूरमचे नगरसेवक धर्मवीर आणि चपराना प्रभाग क्रमांक 152 चे नगरसेवक निखिल यांनी आपला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपनं बहुमतामुळे मिळविलेल्या विजयानंतर आपला आता महापालिकेत हादरे देण्यास सुरुवात केली आहे.

BJP vs AAP .jpg
Shrikant Shinde : राहुल गांधी चीनचे प्रवक्ते, तर अखिलेश यादवांना महाकुंभावरून सुनावले; खासदार शिंदेंनी संसद गाजवली

दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाची एप्रिलमध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप आपली पूर्ण ताकद पणाला लावणार आहे यात शंका नाही. त्याच दृष्टीने भाजपनं आता आपली पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आपच्या तीन नगरसेवकांमुळे भाजपच्या संख्याबळात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आतापासून दिल्ली महापालिकेकडे लक्ष ठेवून असल्याचं दिसून येत आहे.

दिल्ली महापालिकेत आपच्या तीन नगरसेवकांनी प्रवेश केल्यानं आता भाजप आणि आपचं संख्याबळ समसमान झालं आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी याकाळात आपच्या जास्तीत जास्त नगरसेवकांना पक्षात आणण्यासाठी मोठ्या हालचाली करण्याची शक्यता आह

BJP vs AAP .jpg
Trupti Desai : वाल्मिक कराड देखील आजारी, धसांनी त्याचीही जेलमध्ये भेट घ्यावी, तृप्ती देसाईंचा खोचक सल्ला

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात महापौरपदासाठीची निवडणूक पार पडली होती. दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाचा कालावधी हा अवघ्या पाच महिन्यांसाठीच होता.या निवडणुकीत आपने भाजपला धोबीपछाड देत विजय मिळवला होता.आम आदमी पक्षाचे महेश शिंची हे महापौर झाले होते.या निवडणुकीत भाजपच्या किशनलाल यांना अवघ्या तीन मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दिल्ली महापौरपदाच्या निवडणुकीत एकूण 263 मते पडली होती. त्यात आपच्या खिंचींना 133 तर भाजप उमेदवार असलेल्या किशनलाल यांना 130 मतं मिळाली होती. तसेच या दोन मतं बाद झाली होती. आता आपचे तीन नगरसेवक दाखल झाल्यानं आणि दिल्लीत सत्तेत परतल्यानं ताकद वाढलेल्या भाजपचा महापौर बसण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com