IAS–IPS बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने UPSC सिव्हिल सेवा परीक्षा 2026 चे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या घोषणेसोबतच देशभरातील लाखो उमेदवारांच्या प्रशासकीय सेवेत जाण्याच्या स्वप्नाला औपचारिक सुरुवात झाली आहे. IAS, IPS, IFS यांसारख्या प्रतिष्ठित सेवांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
UPSC कडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, सिव्हिल सेवा परीक्षा 2026 अंतर्गत एकूण 933 पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे प्रशासनात जाण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज प्रक्रिया 4 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना 24 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in भेट द्यावी.
आयोगाने उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी पात्रता अटी, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि परीक्षा प्रक्रियेबाबतच्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला आहे. अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज केल्यास तो नाकारला जाऊ शकतो, त्यामुळे अर्ज भरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
या 933 पदांपैकी 33 पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्ये दृष्टिबाधित व कमी दृष्टिक्षम उमेदवारांसाठी 7 पदे, श्रवण बाधित उमेदवारांसाठी 11 पदे, शारीरिक अपंगत्व असलेल्या उमेदवारांसाठी 8 पदे आणि बहुदिव्यांगता असलेल्या उमेदवारांसाठी 7 पदांचा समावेश आहे. मात्र अंतिम पदसंख्येत बदल होण्याची शक्यता असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. कॅडर कंट्रोलिंग अथॉरिटी कडून अंतिम आकडे आल्यानंतर आवश्यकतेनुसार सुधारणा केली जाऊ शकते.
UPSC सिव्हिल सेवा परीक्षा 2026 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेचा विचार करता, 1 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 32 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयात सवलत दिली जाणार आहे.
देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC सिव्हिल सेवा परीक्षेसाठी योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आयोगाने केले आहे. शिक्षण क्षेत्रात या नोटिफिकेशनमुळे मोठा उत्साह पाहायला मिळत असून तरुणांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.