Maharashtra Muslims stuck in Saudi Arabia Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Muslims stuck in Saudi Arabia : महाराष्ट्रातील 50 हजार ते 1 लाख मुस्लिम सौदी अरेबियात अडकले; अल्पसंख्याक आयोग मुख्यमंत्री फडणवीसांच्या संपर्कात

Minority Commission fears 1 lakh Umrah pilgrims stuck in Saudi Arabia during Razadan? इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे रमजान काळात उमरा इथं धार्मिक विधीसाठी महाराष्ट्रातून सौदी अरेबियात गेलेले 50 हजार ते 1 लाख मुस्लिम अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Pradeep Pendhare

US Israel Iran war : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणविरोधात युद्ध छेडले असून, यात इराणच्या इस्लामिक रिपब्लिकचे सर्वोच्च नेता अयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी यांचा मृत्यू झाला आहे. खोमेनी यांच्या मृत्यूचे पडसाद जगभर उमटत असताना, भारतातील काही भागात या युद्धाचा निषेध करण्यासाठी मुस्लिमांनी निर्देशने केली.

यातच महाराष्ट्रातून उमरा या धार्मिक विकासाठी महाराष्ट्रातून सौदी अरेबियात गेलेल्या मुस्लिमांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या युद्धामुळे सौदी अरेबियात महाराष्ट्रातील सुमारे 50 हजार ते 1 लाख मुस्लिम अडकले आहेत. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी देखील या माहितीला काहीप्रमाणात पुष्टी देत आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाने यासंदर्भात तातडीने हालचाली सुरू करत, सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

मुस्लिमांचा (Muslim) रमजान काळ सुरू आहे. उमरा या धार्मिक विधीसाठी, भारतातून अनेक मुस्लिम मक्का-मदीना (सौदी अरेबियाला) इथं जात असतात. महाराष्ट्रातून देखील सौदी अरेबियात जाणाऱ्यांची संख्या खूप असते. या वेळी मोठ्याप्रमाणात मुस्लिम मक्का-मदीना इथं गेले आहेत. परंतु इराणविरोधात अमेरिका आणि इस्त्रायलने युद्ध पुकारल्याने हे सर्व तिथं अडकून पडले आहेत.

दोन दिवसांच्या या युद्धात दोन्ही बाजूने विध्वंसक शस्त्रांचा मारा सुरू आहे. यातच इराणच्या इस्लामिक रिपब्लिकचे सर्वोच्च नेता अयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी यांचा मृत्यू झाल्याने युद्ध आणखी ताण्याची शक्यता आहे. या युद्धाचा जगावर परिणाम सुरू झाला असून, संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धात ढकलेले जाण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

यातच सौदी अरेबियात उमरासाठी महाराष्ट्रातून (Maharashtra) गेलेल्या मुस्लिमांचा आकडा समोर आला आहे. जवळपास 50 हजार ते 1 लाख मुस्लिम सौदीत असल्याचे समोर येत आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी देखील यावर दुजोरा दिला. राज्य अल्पसंखयांक आयोगाने यासंदर्भात तातडीने हालचाली सुरू करत, सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

यंदा महाराष्ट्रातील सुमारे 500 टूर ऑपरेटर्सनी उमरा या धार्मिक विधीसाठी मुस्लिम यात्रेकरूंना पाठवले असून, त्यापैकी केवळ मुंबईतूनच 100 हून अधिक टूर ऑपरेटर्स सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.

हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची नोंद सरकारकडे अधिकृतपणे होते, मात्र उमरासाठी जाणाऱ्यांची कोणतीही केंद्रीकृत नोंदणी नसते. बहुतांश यात्रेकरू खासगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या माध्यमातून प्रवास करतात. त्यामुळे नेमका आकडा सांगणे कठीण होत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांची संख्या स्पष्ट करण्यासाठी सर्व टूर ऑपरेटर्सशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत नेमकी संख्या स्पष्ट होईल, असे प्यारे खान यांनी सांगितले.

आयोग राज्य सरकारच्या संपर्कात असून, सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संपर्क साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT