

Jalna Politics : केंद्रसह राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमधील आमदार आता राजकारणाला वैतागले की काय, अशी परिस्थिती आहे.
जालना जिल्ह्यातील परतूरचे भाजप आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. आमदार लोणीकर यांच्या या घोषणेमुळे भाजपमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपचे (BJP) आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा झाला. आमदार लोणीकर यांच्यावर विरोधकांसह त्यांच्या समर्थकांनी शुभेच्छाचा वर्षाव केला. कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर लोणीकर यांना लाडू तुला करावी लागली. कार्यक्रमात उत्साह असतानाच, आमदार लोणीकर यांनी भाषणात राजकीय सेवानिवृत्तीची घोषणा केली. त्याचक्षणी कार्यकर्ते उत्साहावर विरजन पडलं.
आमदार लोणीकर (Babanrao Lonikar) म्हणाले, "मी आता थकलो नाही. युवकांना संधी मिळणे आवश्यक आहे. माझे पुत्र आता निवडणुकीसाठी सज्ज असून ते 'वेटिंग'वर आहेत. त्यामुळे मी विधानसभा लढवणार नाही. निवडणूक लढणार नसलो, तरी आपण म्हातारा झालेलो नाही."
लोणीकर यांनी ही घोषणा केली असली, तरी पुढची राजकीय महत्वाकांक्षी लगेच सांगून टाकली आहे. लोणीकर यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेणार नसल्याचेही स्पष्ट केलं आहे. "पक्षाने संधी दिली, तर आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे," असे या वेळी त्यांनी स्पष्ट केले.
लोणीकर यांना राज्याच्या राजकारणातून केंद्राच्या राजकारणात जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. लोणीकर यांची परतूर विधानसभा मतदारसंघावर एकहाती पकड आहे. त्यांनी केंद्रात जाण्याची इच्छा व्यक्त करताना, मुलासाठी राज्याच्या राजकारणात प्रवेश निश्चित केल्याचे, त्यांच्या विधानावरून स्पष्ट केल्याचं दिसतं आहे.
जालना जिल्ह्याच्या राजकारणात लोणीकर यांच्या या भूमिकेचे आगामी काळात चांगलेच पडसाद उमटण्याची शक्यता आहे. लोकसभा गाठण्यासाठी लोणीकर भविष्यात कोणते राजकीय डावपेच आखतात, तसंच पुत्राच्या राजकीय वाटचालीसाठी कोणती राजकीय भूमिका, अजेंडा ठरवतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.