Nashik police with rescued child
Nashik police with rescued child  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खंडणीसाठी मुंबईतून अपहरण केलेल्या मुलाची नाशिक पोलिसांकडून यशस्वी सुटका

Sampat Devgire

नाशिक : खंडणीसाठी मुंबई येथून चार वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. नाशिकरोड पोलीसांनी या मुलाची अवघ्या काही तासांत नाशिक येथून अपहरणकर्त्यांला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली. खंडणीसाठी हे अपहरण झाल्याने त्याचे गांभिर्य लक्षात घेत संशयीत आरोपीला अटक करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, सोमवारी (ता.८) दुपारी चारला ठक्कर बाप्पा कॉलनी, इंदिरा नगर, चेंबूर, मुंबई येथून चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. या प्रकरणी नेहरूनगर (कुर्ला) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

या गुन्ह्यातील आरोपी हा चार वर्षाच्या मुलाला घेऊन मुंबईहून रेल्वेने नाशिकच्या दिशेने गेल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळाली. ही माहिती समजल्यानंतर त्यांनी तात्काळ सर्व पोलिस स्टेशन्स व वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविली. अपहरणकर्ता चार वर्षाच्या मुलाला घेऊन नाशिकरोड परिसरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी स्वतः लक्ष घातले. पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी त्याबाबत विशेष पथकाला सक्रीय केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी विशेष पथक करून रेल्वे स्टेशन, बस स्थानक व इतर ठिकाणी एक पथक नियुक्त केले होते. या पथकातील पोलिस अंमलदार कैलास थोरात यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेल्वे स्थानकाजवळील देवी चौकात एक अनोळखी इसम लहान मुलाला घेऊन संशयास्पदरित्या फिरत होता. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, राजू पाचोरकर, विशाल पाटील, राकेश बोडके, निलेश विखे यांनी देवी चौक परिसरात चार वर्षीय मुलाला घेऊन फिरणाऱ्या रामपाल उदयभान तिवारी (उत्तर प्रदेश ) यास ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने अपहरणकर्ता चार वर्षाच्या मुलाच्या आई-वडिलांकडून ५० हजार रुपये मिळवण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केल्याचे कबूल केले. त्या बालकाला घेऊन उत्तर प्रदेश येथे जाणार असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी अपहरण झलेल्या चार वर्षाच्या मुलाला मुबई येथिल नेहरूनगर पोलिस ठाण्यातील पोलिस पथकाच्या ताब्यात दिले. त्यामुळे मुलाच्या पालकांनी निश्वास सोडला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT