MNS Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MNS News : मनसे जिल्हाध्यक्षासह 45 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Ahmednagar Crime : भगवानगड औद्योगिक संस्थेची स्थापना 1992 साली झाली होती.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील भगवानगड औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या नावाने घेतलेली जमीन अकृषक करून तिच्यावर बनावट ले-आऊट दाखवून परस्पर खरेदी-विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष (MNS), त्यांचे वडिल यासह 45 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भगवानगड औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेचे चाचणी लेखापरीक्षण सहकार विभागाने केला. यात तफावत आढळली. यावर पाथर्डीच्या सहायक निबंधक अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला. यानुसार सहकार खात्याचे उपलेखापरीक्षक महेंद्र घोडके यांनी फिर्याद दिली. यानुसार संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक आणि सभासद, अशा मिळून एकूण 45 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भगवानगड (BhagwanGad) औद्योगिक संस्थेची स्थापना 1992 साली झाली होती. या संस्थेने खरवंडी कासार परिसरात संस्थेला लघुउद्योग करण्यासाठी कायम खरेदीने शेतजमीन विकत घेतली होती. लघुद्योग करण्यासाठी ही जमीन अकृषक करून मिळावी, असा प्रस्ताव 94 साली संस्थेचे तत्कालीन चेअरमन लिंबाजी नाना खेडकर यांनी महसूल प्रशासनाकडे दाखल केला.

हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर महसूल प्रशासनाने ही 87.50 हेक्टर जमीन बिनशेती करण्यास परवानगी सुद्धा दिली. मात्र ही परवानगी मिळाल्या नंतर संस्थेचे पदाधिकारी, संचालक व काही सभासदांनी मिळून संस्थेच्या 24 सभासदांकरीता 24 आणि संस्थेसाठी एक, असे एकूण 25 प्लॉट पाडले. त्याचा बनावट ले-आऊट करून इतरांना स्वतःच्या फायद्यासाठी विकले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे करताना संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत संस्थेची फसवणूक केली. संस्थेच्या या व्यव्हारा संदर्भात काही सभासदांनी तक्रारी केल्यानंतर या सर्व व्यवहारांची सहकार खात्याने चौकशी केली. यामध्ये संस्थेच्या नावाने घेतलेली जमीन संचालक मंडळ, सभासद यांनी स्वतःच्या नावाने करत संस्थेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. यानुसार 45 जणांविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झालेले 45 जण

लिंबाजी नाना खेडकर, विष्णू किसन खेडकर, शिवाजी दशरथ जाधव, लक्ष्मण पांडुरंग गायकवाड, गोरक्ष ज्ञानोबा खेडकर, भीमराव ज्ञानोबा खेडकर, बाबासाहेब महादेव घोडके, महादेव भीमराव खेडकर, दत्तविजय सोमनाथ शेटे, रिकबचंद भागचंद कटारिया, हिरालाल माणकचंद बोथरा, मुकुंद चंद्रकांत चिंतामणी, प्रल्हाद किसन जोशी, मुरलीधर किसन जोशी यांच्यासह एकूण 45 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT