Political News : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. आर्थिक व्यवहारातून पदे वाटप झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यापूर्वीही पदांसाठी आर्थिक व्यवहार आणि वस्तूंची मागणी केल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारेवर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशाच आरोपांच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. सुरुवातीला नाराजीनाट्यानंतर आता पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरु झाले आहे.
शुक्रवारी गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते व रत्नाकर शिंदे या तिघांच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी तर निझाम शेख यांची शहर प्रमुखपदी निवडी जाहीर झाल्या. तर, जिल्हा प्रमुख असलेले अनिल जगताप, माजी मंत्री बदामराव पंडित व बाळासाहेब अंबुरे या तिघांची सहसंपर्कप्रमुखपदी निवडी केल्या. सुरुवातीलाच पक्षाचे वडवणी तालुकाध्यक्ष संदीप माने यांनी शिवसेना नसून अंधारे सेना तयार करायला सुरु असल्याचा आरोप करत राजीनामा दिला. तर, वडवणीचे शहराध्यक्ष विष्णू टकले यांनीही राजीनाम्याची घोषणा केली.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी तत्कालिन जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांनीही सुषमा अंधारे यांच्यावर असेच जाहीररित्या गंभीर आरोप केले होते. त्यानंतर जाधव यांना पदावरुन हटवून रत्नाकर शिंदे यांना जिल्हा प्रमुख करण्यात आले. मात्र, कलाकेंद्रातील मुलीच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून रत्नाकर शिंदे यांचे नाव आल्याने त्यांना या पदावरुन हटविले होते. मात्र, काहीच महिन्यांत झालेल्या या फेरबदलात पुन्हा त्यांची या पदावर निवड झाली.
शनिवारी सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांचे होमग्राऊंड असलेल्या परळीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारेंवर आर्थिक व्यवहारचे आरोप करत येथील तालुकाप्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सामुहिक राजिनामे दिले. सुषमा अंधारे यांच्याबद्दल तक्रारी घेवून मातोश्रीवर (मुंबई) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackrey ) यांना भेटण्यासाठी गेलो असता पक्षप्रमुखांनी आम्हाला भेट दिली नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला. संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी जिल्हाप्रमुख म्हणून शिफारस करण्यासाठी पैशांची मागणी केली. बदनाम झालेल्या पास्कोसारखे गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तीला पुन्हा जिल्हाप्रमुख पद आर्थिक व्यवहार करुन देण्यात आल्याचा आरोप व्यंकटेश शिंदे यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर, अंबाजोगाईचे मदन परदेशी, वडवणीचे संदीप माने, जिल्हा सह संघटक राजाभाऊ लोमटे, रमेश चौंडे, अंबाजोगाईचे शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, वडवणीचे विष्णू टकले, युवासेनेचे अतुल दुबे, उपजिल्हा प्रमुख दीपक शिंदे, संतोष चौधरी, बाबा सोनवणे, मोहन परदेशी, मोहन राजमाने, किशन बुंदेले, तुकाराम नरवाडे, सोमनाथ काळे, हनुमान भारती, नागेश मुरकुटे, विजय राठोड, शंकर डाके, राम किर्दंत, पृथ्वीराज उंबरे, सोमनाथ मस्के, बाळासाहेब शेंडगे, रमेश कुरकुटे, कृष्णा सुरवसे, सुदर्शन यादव, उमेश सोळंके, गोविंद गरड, गौरव क्षीरसागर, बालाजी मोरे, भक्तराज कराळे, शिवसेना विभाग प्रमुख अमोल यांच्यासह आणीख दहा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.