Pankaja Munde Bhagwangad Dasara Melava : ‘काही लोक म्हणतात पंकजा मुंडे पक्ष बदलणार; पण माझी निष्ठा एवढी लेचीपेची नाही’

Dasara Melava : जिंकण्यासाठी तुम्ही निष्ठा आणि नीतिमत्ता गहाण ठेवू शकत नाही.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : कुणी म्हणतं पंकजा मुंडे या पक्षात चालल्या. कुणी म्हणतं ताई त्या पक्षात चालल्या. पण, पंकजा मुंडेंची निष्ठा एवढी लेचीपेची नाही. अनेक पदं देऊनसुद्धा ती तुम्हाला मिळवता आली नाही. पद न देताही निष्ठा काय असते, हे या लोकांना विचारा, असे आव्हान पंकजा मुंडे यांनी स्वपक्ष भाजपला दिले. तसेच, पक्षांतराबाबत उठणाऱ्या वावड्यांनाही त्यांनी उत्तर दिले. (Pankaja Munde Bhagwangad Dasara Melava : Pankaja Munde's answer to defection rumours)

भगवान भक्तीगडावर आज (ता. २४ ऑक्टोबर) दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी परळीत पराभव आणि पक्षांतरांच्या अफवांना उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, जातपात न पाहता मी सर्वांना निधी दिला, पण मागील निवडणुकीत मी पडले. पडलं म्हणून काय झालं. पाय मोडल्यानंतर मला कुबड्या घेऊन चालावं लागेल. या कुबड्या एक तर पक्ष देऊ शकतो किंवा आमची जनता देऊ शकते. माझ्या जनतेने मला एवढी ताकद दिली आहे की, दोन महिन्यांत मी मॅरेथान पळायला तयार झाले. मी मनाने कधीही खचले नाही. तुमची सेवा करण्यात खंड पडला एवढंच, यामुळे मी तुमची माफी मागते. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde
Solapur Loksabha : सुशीलकुमार शिंदेंची मोठी घोषणा; प्रणिती शिंदेच सोलापूर लोकसभेच्या उमेदवार

दरवेळी तुम्ही आशा लावता, पण दरवेळी तुम्हाचा अपेक्षाभंग होतो. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे हात जोडून तुमची माफी मागते, माझ्याकडे केवळ नीतिमत्ता आहे. गोपीनाथ मुंडेंची लेक म्हणून असलेली हिंमत आणि जनतेवर असलेला विश्वास ही माझी संपत्ती आहे. दहा वेळा स्वप्न तुटलं. प्रत्येकी वेळी नवं स्वप्न जन्म घेते. मी पडले तर पडले. अगदी देवांनाही संकट आली, युद्धात पराभव पत्करावा लागला आहे. त्या पराभवामुळे मी खचून जाणार नाही. हरले तरी माझ्या गळ्यात लोक सन्मानाने हार घालतात. त्यामुळे यापुढे आपल्याला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू. आता माझ्या माणसाला त्रास होणार नाही, असे आव्हानही त्यांनी आपल्या विरोधकांना दिले.

नीतिमत्ता बाजूला ठेवून राजकारण करणं, हे देशाच्या हिताचं नाही, असे विधान मोहन भागवत यांनी केले आहे. वाघ आणि सिंहांचा मिळून बछडा तयार करता येतो. पण वाघ आणि बकरीचा बघळा तयार करता येणार नाही. जिंकण्यासाठी तुम्ही निष्ठा आणि नीतिमत्ता गहाण ठेवू शकत नाही.

Pankaja Munde
Pankaja Munde Dasara Melava Speech : पंकजा मुंडेंनी परळीसाठी पुन्हा रणशिंग फुंकले; ही सीट लढा, ती सीट लढा, असं चालणार नाही

शिवशक्ती परिक्रमा करण्यापूर्वी मी पक्षाची सच्ची कार्यकर्ता आहे, असं वाटतं होतं. पण, शिवपरिक्रमेनंतर मला लोकभावनाचा साक्षात्कार झाला. कारखान्याच्या प्रश्नावर तुम्ही अकरा कोटी जमा केले. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, मी त्यांची कर्जदार नाही, तर तुमची आहे. त्यामुळे माझं सर्वस्व तुमचं आहे. ज्या ठिकाणी आमच्या लोकाचं भलं आहे, त्याच ठिकाणी पंकजा मुंडे नतमस्तक होईल.

Pankaja Munde
Pankaja Munde Dasara Melava 2023 : पंकजा मुंडे भगवान भक्तीगडावर दाखल; कार्यकर्त्यांना काय संदेश देणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com