Parvez Ashrafi 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : इम्तियाज जलीलांना भेटताच, परवेज अशरफींनी नगरच्या आमदारकीविषयी तोफ डागली

Pradeep Pendhare

Ahmednagar News : विधानसभा निवडणुकीसाठी 'MIM'ने संपूर्ण महाराष्ट्रात कंबर कसली असून, उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा क्षेत्रातून इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यास सुरवात केली असून, नगर शहर विधानसभा मतदारसंघात 'एमआयएम'चे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी उमेदवारीची तयारी सुरू केली आहे.

प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेत, बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेनंतर परवेज अशरफी यांनी नगर शहरातील घराणेशाहीच्या राजकारणावर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी 'MIM'ने महाराष्ट्रात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या औरंगाबाद इथल्या कार्यालयात संपूर्ण महाराष्ट्रातून इच्छुकांची गर्दी केली होती. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील 12 मतदारसंघातून इच्छुकांची चाचपणी सुरू आहे.

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी परवेज अशरफी यांच्याकडून नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची वाढलेली संख्या पाहून नगर जिल्ह्यात अनुकूल, असे वातावरण असल्याचे त्यांना देखील खात्री पटली आहे. नगर शहराचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे, असे मत त्यांनी नोंदवले. परवेज अशरफी म्हणाले, "यावर वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे, त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. नगर शहराला, असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती-जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजणारा लोकप्रतिनिधी नको. यामुळेच पक्षाकडे मी उमेदवारी मागितली".

'मविआ' धोकेबाज

नगर शहरातून जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल करताना नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आल्याचे अशरफी यांनी सांगितलं. "लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकस आघाडीला भरभरून मतदान केले. परंतु 'मविआ'ने लोकसभेत एकही मुस्लिमांचा उमेदवार दिलेला नाही". औरंगाबादमधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधनने पूर्ण शक्ती लावली. तसेच विधान परिषदेतही मुस्लिमांना उमेदवारी दिलेली नाही. याचाच अर्थ 'मविआ'ला मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे मत पाहिजेत. परंतु मुस्लिमांचा नेता नको, अशी टीका परवेज अशरफी यांनी केली.

महायुतीला मुस्लिमांची गरजच नाही

तसंच परवेज अशरफी यांनी महायुतीवर देखील निशाणा साधला. "'मविआ' पेक्षा महायुती एक पाऊल पुढे आहे. मुस्लिम अल्पसंख्याक समाजच नको, मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्यांना नेत्याचे मुख्यमंत्री संरक्षण करत आहेत. गृहमंत्र्यांनी देखील त्यांच्या सुरक्षितेत वाढ केली. मुस्लिमांविरोधात जो बोलेल, त्यांना सरकार पूर्ण सुरक्षा देत आहे. यांचे आमदार, मुस्लिमांना घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठ राखण करतात. यावरून स्पष्ट दिसते की, 'मविआ' आणि महायुतीला मुस्लिम समाजाची गरज नाही", असा निशाणा परवेज अशरफी यांनी साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT