Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट करता येते का? असा प्रश्न केला. तर एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा इथं घेऊ नये, असं म्हणत कुठे घ्यायचा यावर देखील खासदार संजय राऊत यांनी सल्ला दिला.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून दसरा मेळाव्याच्या तयारीवर खासदार राऊत यांनी खोचक भाष्य केले. शिंदे दसरा मेळावा घेणार. पण तो कोठे घ्यावा, यावर खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सल्ला दिला.
खासदार राऊत म्हणाले, "हे आता दसरा मेळावा घेणार आहेत. यांच्या दसरा मेळाव्याची जागा कुठं आहे? तर सुरत! तिथं त्यांच्या शिवसेनेचा (Shiv Sena) जन्म झाला. त्यांच्या पक्षाला अडीच वर्ष झालीत. शिंदे दोन ठिकाणी दसरा मेळावा घेऊ शकतात. त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला आहे तिथं आणि दुसरं गुवाहाटी. कामाख्या देवीच्या मंदिरासमोर!"
खासदार राऊत म्हणाले, "लाडकी बहीण योजना बहिणींची मत विकत घेण्यासाठी चालवलेली योजना आहे. बहिणींवर यांचे प्रेम उफाळून आलेलं नाही. राज्याच्या तिजोरीत पैसे नाही. प्रमुख प्रकल्प, योजनांचे पैसे लाडक्या बहीण योजनेकडे वळवलेत. लाडक्या बहिणी योजनेवरून देखील सत्ताधारी महायुतीत मारामारी सुरू आहेत".
भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही लाभार्थ्यांना पत्र पाठवलं असून, त्यात 'मुख्यमंत्री' हा शब्द वगळला आहे. एका योजनेसाठी राज्यातील इतर प्रकल्पांचा निधी वगळला जात असेल, तर केंद्र सरकारची याबाबत काही जबाबदारी आहे की नाही? ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचा अधिकार आहे, करतात, त्यात कुठेही आर्थिक बेशिस्त, असता कामा नये. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी यावर केंद्रात प्रस्ताव मांडायला हवा, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.